दिग्गज फुटबॉलपटू लियोनल मेस्सी स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’मध्ये सलग पाचवा गोल करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळे बार्सिलोना विरुद्ध अलावेस संघांतील सामना १-१ ने अनिर्णित राहिला. अलावेस संघाने ३१व्या मिनिटाला लुईस रियोजाच्या गोलवर आघाडी मिळवली होती. परंतु पुढे ६२व्या मिनिटाला जोटाला लाल कार्ड देण्यात आले. त्यामुळे अलावेस संघाला उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला. यानंतर बार्सिलोनाच्या एंटोनी ग्रीजमॅनने गोल करत अलावेसशी बरोबरी केली.
मेस्सीला या हंगामात आतापर्यंत केवळ एक गोल करण्यात यश आले आहे. तो गोलदेखील त्याने पहिल्या सामन्यात पेनल्टीवर केला होता. त्यानंतर मेस्सी सलग पाचव्या सामन्यात गोल करण्यात अयशस्वी झाला आहे. मेस्सीबरोबरच बार्सिलोना संघातील इतर स्टार खेळाडूही अलावेसविरुद्ध गोल करण्यासाठी संघर्ष करताना दिसले. तसेच, अलावेसच्या डिफेन्सचा सामना करणेही त्यांना कठीण गेले.
बार्सिलोनाचा ‘ला लीगा’मधील पुढील सामना शनिवारी (७ नोव्हेंबर) होईल. यावेळी त्यांची रियल बेटिस संघासोबत लढत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिस्टियानो रोनाल्डोची कोरोनावर मात; युव्हेंट्स संघाने दिली माहिती
पाहावं ते नवलंच! कॅमेराने दाखवला फुटबॉल म्हणून लाईन्समनचा टक्कल
मेस्सीच्या बार्सिलोना संघाच्या थरारक प्रदर्शनामुळे रोनाल्डोचा संघ चितपट, २ वर्षांनंतर घडलं ‘असं’
EPL: सोन-केनच्या जोडीची जबरा कामगिरी; नोंदवला हंगामातील नववा गोल