---Advertisement---

…म्हणून बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणाऱ्या मेस्सीच्या मुलाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

On: मंगळवार, डिसेंबर 3, 2019 7:01 PM
---Advertisement---

पॅरिस। सोमवारी(2 डिसेंबर) फुटबाॅल जगतातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार बॅलन डी’ओरचा वितरण सोहळा पॅरिसमध्ये पार पडला. यावर्षी हा पुरस्कार बार्सिलोना फुटबॉल क्लबचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने पटकावला. मेस्सीने सहाव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

सोमवारी रात्री जेव्हा हा पुरस्कार मेस्सीला जाहीर झाला तेव्हा त्याचा मधला मुलगा मटेओ त्याचा आनंद लपवू शकला नाही. मेस्सीला बॅलन डी’ओर हा प्रतिष्ठित पुरस्काराचा विजेता घोषित केल्यावर कॅमेरा मटेओकडे पॅन केला होता. तेव्हा चार वर्षांचा मुलगा मटेओ आपल्या आसनावर उत्साहाने उड्या मारत होता आणि त्याचा चेहरा आनंदित झाला होता.

हा व्हिडिओ #BallondOr च्या ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच सर्वांचेच मन जिंकलेल्या मटेओचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/francefootball/status/1201601282311675905

मेस्सीने लिव्हरपूलचा बचावपटू व्हर्जिन व्हॅन डिजिकला मागे टाकत हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्काराच्या यादीत मेस्सी आणि व्हर्जिन व्हॅन डिजिकच्या पाठोपाठ ख्रिस्तियानो रोनाल्डो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

तसेच मेस्सी सर्वाधिकवेळा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणारा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने 5 वेळा हा पुरस्कार मिळवणाऱ्या रोनाल्डोला मागे टाकले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---