---Advertisement---

बड्डे स्पेशल: फुटबॉलसाठीच जन्मलेला मेस्सी, वाचा त्याचे आश्चर्यकारक विक्रम

On: शुक्रवार, जून 24, 2022 4:10 PM
---Advertisement---

अर्जेंटिनाच्या रोसारिओमध्ये २४ जून १९८७मध्ये एका मुलाचा जन्म झाला. तो मुलगा जन्माला आला फक्त फुटबाॅल खेळायला. देव काही तरी घेतो तर मोबदल्यात खुप जास्त देतो. लहानपणी त्या मुलाच्या हॉर्मोनच्या वृद्धिमध्ये कमतरता होती पण फुटबाॅल खेळायची जिद्द पण तेवढीच. त्यासाठीच त्याला उपचाराला स्पेनमध्ये नेण्यात आले. पुढे उपचार झाल्यावर तो मुलगा एक मोठा फुटबॉलपटू बनला. त्याचे नाव लिओनल मेस्सी (Lionel Messi) जे फुटबाॅल प्रेमींसाठी काही नवीन नाही.

युइएफएच्या स्पर्धेत १०० गोल करणारा मेस्सी दुसराच फुटबॉलपटू ठरला आहे. सध्या तो पॅरीस सेंट जर्मेन (पीएसजी) या फ्रान्सच्या लीग १ क्लबकडून खेळत आहे. त्याने १६ ऑक्टोबर २००४ साली बार्सिलोना एफसीसाठी पदार्पण केले होते. पुढे तो जवळपास दोन दशके या क्लबकडून खेळला. या दरम्यान त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याने बार्सिलोनाकडून एकूण ६७२ गोल केले आहेत. त्याने युइएफए चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यांत २८ गोल केले आहेत.

मेस्सीवर फुटबॉलविश्वातूनच नाही सगळीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षाव होत आहे. या लेखामध्ये आपण त्याने केलेले काही विक्रम पाहणार आहोत.

बार्सिलोनासाठी केलेल गोल,

ला लीगामध्ये बार्सिलोनाकडून सर्वाधिक असे ४७४ गोल केले आहेत. युइएफए चॅम्पियन्स लीगच्या साखळी सामन्यात ७१ गोल, युइएफए चॅम्पियन्स लीगमध्ये एका क्लबसाठी १२० गोल, युइएफएच्या क्लब स्पर्धेत १२३ गोल. त्याने ३६ लालीगा हॅट्ट्रीक नोंदवल्या आहेत. त्याने २०११-१२च्या ला लीगा हंगामात सर्वाधिक असे ५० गोल केले होते.

क्लब आणि राष्ट्रीय संघासाठी जिंकलेल्या ट्रॉफी,

मेस्सीने कारकीर्दीत ३५ ट्राॅफी त्याने जिंकल्या आहेत. त्यामध्ये १० ला लीगा, ७ स्पॅनिश सुपर कप, ७ कोपा डेल रे, ४ चॅम्पियन्स लीग, ३ युरोपियन सुपर क्लब, ३ फिफा क्लब वर्ल्डकप, लीग१ ट्रॉफी, १ कोपा अमेरिका आणि ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदकाचाही यामध्ये समावेश आहे. त्याने सर्वाधिक गोल्डन शूज (७) आणि फिफाचा ‘द बेस्ट’ पुरस्कार दोन वेळा पटकावला आहे.

फुटबाॅलमध्ये सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या बॅलोन डीओर अवॉर्डचा मेस्सी सर्वाधिक (७) वेळेस मानकरी ठरला आहे. एका वर्षात आणि एका हंगामामध्ये क्लबसाठी सर्वाधिक गोल ला लीगामध्ये, सर्वाधिक असिस्ट, एका हंगामात सर्वाधिक गोल्स आणि ३०० गोल करणारा मेस्सी प्रथम फुटबाॅलपटू ठरला. त्याने आठ वेळा पिचीची पुरस्कारही पटकावला आहे.

मेस्सीची पहिली हॅट्ट्रीक, १० मार्च,२००७मध्ये पदार्पणाच्या एल क्लासिको सामन्यात ३-३ असा स्कोरकार्ड असता त्याने हॅट्ट्रीक केली.

फुटबॉलमध्ये एका अर्जेंटिनाच्या युवा खेळाडूने केलेला गोल हा मेस्सीच्याच नावावर आहे. त्याने १८ वर्ष २५७ दिवस वय असताना ही कामगिरी केली आहे.

यावर्षी झालेल्या युरोप आणि दक्षिण अमेरिका ट्रॉफीमध्ये अर्जेटिनाने इटलीचा पराभव केला होता. तेव्हा मेस्सीने संघाने उत्तम नेतृत्व करत या सामन्यात दोन असिस्ट केल्या. हा सामना अर्जेटिनाने ३-०ने जिंकला.

क्लब आणि देशासाठी एका वर्षात सर्वाधिक गोल (९१ गोल २०१२मध्ये) विक्रम गिनिस वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये मेस्सीने आपल्या नावावर केला आहे. एक वर्षात देशासाठी सर्वाधिक गोल्स (१२) चा विक्रम पण त्याने आपल्या नावावर केला आहे. त्याने अर्जेंटिनाकडून सर्वाधिक असे १६२ सामने खेळताना सर्वाधिक ८६ गोल केले आहेत. याबरोबर तो आजच्या घडीला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अशा या जगातल्या महान फुटबाॅलपटू लिओनल मेस्सीला ३५ व्या वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

रणजीतील प्रदर्शनाचे मिळणार फळ? सरफराज खानचे ‘या’ संघाविरुद्ध होऊ शकते कसोटी पदार्पण

धोनीच्या शिष्याने केली लाजिरवाणी हरकत, व्हिडिओ पाहून तुम्हालाही भरेल संताप

रोहित vs बुमराह, वेगवान गोलंदाजाने स्वत:च्या कर्णधारालाच मारला चेंडू; वेदनेने मैदानातच विव्हळू लागला हिटमॅन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment