इंडियन प्रीमियर लीग २०२१ची (आयपीएल) सुरुवात व्हायला जवळपास एका आठवड्याचा कालावधी उरला आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पाहता आयपीएलचा तेरावा हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये आयोजन्यात आला होता. यानंतर यंदाचा हंगाम मायभूमीत अर्थात भारतात खेळवला जाणार आहे. अशात चाहत्यांची नजर केवळ आयपीएलवर खिळली आहे.
आयपीएलच्या प्रत्येक संघातील ११ जणांमध्ये ७ भारतीय आणि ४ परदेशी खेळाडूंचा समावेश असतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूची भूमिका संघासाठी महत्त्वपूर्ण ठरते. तरी, कोणत्याही संघाला यशस्वी बनवण्यात त्याच्या कर्णधाराचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यामुळेच, आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ सर्वात यशस्वी ठरले आहेत. केवळ भारतीय खेळाडूच नव्हे तर अनेक परदेशी खेळाडूंनीही आयपीएलच्या बऱ्याच संघाचे नेतृत्व केले आहे.
या लेखात आयपीएलमधील सर्व संघांच्या सर्व कर्णधारांची यादी देण्यात आली आहे. List of all indian premier league ipl captains.
आयपीएलमधील सर्व संघाचे सर्व कर्णधार-
पुणे वॉरियर्स (२०११-२०१३) –
१. युवराज सिंग
२. सौरव गांगुली
३. स्टिव्ह स्मिथ
४. ऍरॉन फिंच
५. अँजेलो मॅथ्यूज
६. रॉस टेलर
कोची टस्कर्स केरळ (२०११) –
१. माहेला जयवर्धने
२. पार्थिव पटेल
राइजिंग पुणे सुपरजायंट्स (२०१६-१७) –
१. एमएस धोनी
२. स्टिव्ह स्मिथ (२०१७साली संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले होते.)
३. अजिंक्य रहाणे
गुजरात लायन्स (२०१६-१७) –
१. सुरेश रैना
२. ब्रेंडन मॅक्यूलम
डेक्कन चार्जर्स –
१. व्हिव्हिएस लक्ष्मण
२. ऍडम गिलक्रिस्ट (२००९मध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले)
३. कॅमेरॉन व्हाईट
४. कुमार संगाकारा
चेन्नई सुपर किंग्स –
१. एमएस धोनी (२०१०, २०११ आणि २०१८मध्ये विजेतेपद मिळवून दिले. तर, २००८, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये अंतिम सामन्यापर्यंत नेले)
२. सुरेश रैना
मुंबई इंडियन्स –
१. हरभजन सिंग
२. शॉन पोलॉक
३. सचिन तेंडुलकर (२०१०मध्ये संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले)
४. ड्वेन ब्राव्हो
५. रिकी पाँटिंग
६. रोहित शर्मा (२०१३, २०१५, २०१७ आणि २०१९मध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले)
७. कायरन पोलार्ड
सनराइजर्स हैद्राबाद –
१. कुमार संगाकारा
२. कॅमरॉन व्हाईट
३. शिखर धवन
४. डॅरेन सॅमी
५. डेव्हिड वॉर्नर (२०१६मध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले)
६. केन विलियम्सन (२०१८मध्ये संघाला अंतिम सामन्यात नेले होते)
७ भुवनेश्वर कुमार
कोलकाता नाईट रायडर्स –
१. सौरव गांगुली
२. ब्रेंडन मॅक्यूलम
३. गौतम गंभीर (२०१२ आणि २०१४मध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले)
४. दिनेश कार्तिक
राजस्थान रॉयल्स –
१. शेन वॉर्न (२००८मध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले)
२. शेन वॉटसन
३. राहुल द्रविड
४. अजिंक्य रहाणे
५. स्टिव्ह स्मिथ
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
१. राहुल द्रविड
२. केविन पीटरसन
३. अनिल कुंबळे (२००९मध्ये संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले होते)
४. डेनियल विटोरी (२०११मध्ये संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले होते)
५. विराट कोहली (२०१६मध्ये संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले होते)
६. शेन वॉटसन
किंग्स इलेव्हन पंजाब –
१. युवराज सिंग
२. कुमार संगाकारा
३. माहेला जयवर्धने
४. ऍडम गिलक्रिस्ट
५. डेव्हिड हसी
६. जॉर्ज बेली (२०१४मध्ये संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले होते)
७. विरेंद्र सेहवाग
८. डेव्हिड मिलर
९. मुरली विजय
१०. ग्लेन मॅक्सवेल
११. रविश्चंद्रन अश्विन
दिल्ली कॅपिटल्स –
१. विरेंद्र सेहवाग
२. गौतम गंभीर
३. दिनेश कार्तिक
४. जेम्स होप्स
५. माहेला जयवर्धने
६. डेव्हिड वॉर्नर
७. केविन पीटरसन
८. जेपी डुमिनी
९. झहीर खान
१०. करुण नायर
११. श्रेयस अय्यर
१२. रिषभ पंत (आयपीएल २०२१)