दिवसेंदिवस इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा रोमांच वाढतच चालला आहे. आतापर्यंत या हंगामातील एकूण २० सामने पार पडले असून प्रत्येक संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी झगडताना दिसत आहे. अशात २५ एप्रिल, रविवार रोजी या हंगामातील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळाली.
एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा विसावा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकात १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादनेही ७ विकेट्स गमावत १५९ धावांपर्यंत मजल मारली. परिणामत सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे हंगामातील पहिली सुपर ओव्हर खेळवली गेली. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारत सामना खिशात घातला.
परंतु तुम्हाला माहिती आहे की, आयपीएल इतिहासातील पहिली सुपर ओव्हर केव्हा खेळली गेली होती? आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात एकूण किती सुपर ओव्हर झाल्यात आहेत आणि त्या कोणत्या संघांमध्ये झाल्या आहेत? चला तर जाणून घेऊया…
आयपीएल इतिहासात आजपर्यंत झालेल्या सुपर ओव्हर्सची यादी-
२५-०४-२०२१: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (चेन्नई, १५९ दिल्ली कॅपिटल्स)
१८-१०-२०२०: मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (दुबई, १७६ पंजाब किंग्ज)
१८-१०-२०२०: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (अबू धाबी, १६३ कोलकाता नाइट रायडर्स)
२९-०९-२०२०: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुबई, २०१ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
२०-०९-२०२०: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (दुबई, १५७ दिल्ली कॅपिटल्स)
०२-०५-२०१९: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (मुंबई, १६२ मुंबई इंडियन्स)
३०-०३-२०१९: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (दिल्ली, १८५ दिल्ली कॅपिटल्स)
२९-०४-२०१७: गुजरात लायन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (राजकोट, १५३ मुंबई इंडियन्स)
२१-०४-२०१५: पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (अहमदाबाद, १९१ पंजाब किंग्ज)
२९-०४-२०१४: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (अबू धाबी, १५२ राजस्थान रॉयल्स)
०७-०४-२०१३: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (हैदराबाद, १३० सनरायझर्स हैदराबाद)
१६-०४-२०१३: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगलोर, १५२ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
२१-०३-२०१०: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज (चेन्नई, १३६ पंजाब किंग्ज)
२३-०४-२००९: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (केपटाऊन, १५० राजस्थान रॉयल्स)
महत्त्वाच्या बातम्या-
…आणि क्रिकेटविश्वाला पहिली ‘डबल सुपर ओव्हर’ आयपीएलने दिली
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
SRHचा पदार्पणवीर, ज्याच्या छोटेखानी खेळीमुळे पाहायला मिळाली हंगामातील पहिली सुपर ओव्हर





