क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हॅट्रिक घेणे सोपे नसते, खासकरून टी20 फॉरमॅटमध्ये तर अजिबात नाही, कारण या प्रकारात फलंदाज नेहमी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि गोलंदाजही स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे असले तरी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात आजपर्यंत 25 गोलंदाजांनी 26 वेळा हॅट्रिक घेतली आहे. यात लसिथ मलिंगा या एकमेव गोलंदाजाने आतापर्यंत दोनदा हॅट्रिक घेतली आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये घेतलेल्या सर्व हॅट्रिक पाहू :
1- ब्रेट ली: ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने 2007 टी20 विश्वचषकामध्ये केपटाऊनमध्ये बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने शकिब अल हसन, मश्ररफे मुर्ताझा आणि आलोक कपाली यांना बाद केले होते.
2- जेकब ओरम: न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जेकब ओरमने 2009 मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्याने अँजेलो मॅथ्यूज, मलिंगा बंदारा आणि नुवान कुलसेकराला बाद केले होते.
3- टिम साऊथी: न्यूझीलंडच्या टीम साऊदीने 2010-11 मध्ये ऑकलंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्याने युनूस खान, मोहम्मद हाफीज आणि उमर अकमल यांना बाद केले.
4- थिसारा परेरा: श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराने 2016 मध्ये रांची येथे भारताविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्याने हार्दिक पांड्या, सुरेश रैना आणि युवराज सिंगला बाद केले होते.
5- लसिथ मलिंगा: श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने 2017 मध्ये कोलंबोमध्ये बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्याने मुशफिकुर रहीम, मश्ररफे मुर्ताझा आणि मेहदी हसन यांना बाद केले होते.
6- फहिम अश्रफ: पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू फहिम अश्रफने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्याने इसुरु उडाना, महेला उदावते, दासुन शनाका यांना बाद केले.
7- राशिद खान: अफगाणिस्तानच्या राशिद खानने 2019 मध्ये डेहराडूनमध्ये आयर्लंडविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने केविन ओब्रायन, जॉर्ज डॉकरेल, गेटकेक आणि सिमी सिंग यांना सलग 4 चेंडूत बाद केले.
8- लसिथ मलिंगा: श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने 2019 मध्ये पल्लेकेले येथे न्यूझीलंडविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने कॉलिन मुनरो, हमिश रदरफोर्ड, कॉलिन डी ग्रँडहोम आणि रॉस टेलर यांना सलग 4 चेंडूंत एकापाठोपाठ एक बाद केले होते.
9- मोहम्मद हसनैन: पाकिस्तानच्या मोहम्मद हसनैनने 2019 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने भानुका राजपक्षे, शनाका आणि शेहान जयसूर्याला बाद केले होते.
10- खावर अली: ओमानच्या खावर अलीने 2019 मध्ये अल अमिराती येथे नेदरलँड्सविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने एजे स्टाल, एकरमैन आणि वैन डर मर्वे यांना बाद केले होते.
11- नॉर्मन वनुआ: पापुआ न्यू गिनीच्या नॉर्मन वानुआने 2019 मध्ये दुबईत बर्म्युडाविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने स्टोवेल, लॅव्हरॉक आणि डॅरेलला बाद केले होते.
12- दीपक चाहर: भारताच्या दीपक चहरने 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध नागपुरमध्ये हॅट्रिक घेतली. त्याने शफीउल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान आणि अमिनुल इस्लाम यांना बाद केले होते.
13- एश्टन एगर: ऑस्ट्रेलियाच्या एश्टन एगरने 2020 मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने फाफ डू प्लेसिस, अँडिले फेलुक्वायो आणि डेल स्टेनला बाद केले.
14- अकिला धनंजय: श्रीलंकेच्या अकिला धनंजयने 2020 मध्ये अँटिग्वा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने एविन लुईस, ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांना बाद केले.
15- वसीम अब्बास: माल्टाच्या वसीम अब्बासने 2021 मध्ये बेल्जियमविरुद्ध मार्सा येथे हॅट्रिक घेतली. त्याने आशिकुल्लाह सैद, खालिद अहमदी आणि नेमिश महता यांना बाद केले.
16- शेराज शेख: बेल्जियमच्या शेराज शेखने माल्टाविरुद्ध 2021 मध्ये मार्टा येथे हॅट्रिक घेतली. त्याने अमन शर्मा, नीरज खन्ना आणि वरुण थामोथाराम यांना बाद केले.
17- नॅथन एलिस: ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसने ढाका येथे 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने महमुदुल्लाह, मुस्तफिजुर रहमान आणि महेदी हसन यांना बाद केले.
18 – एलिजेह ओटिएनो: केनियाच्या एलिजेह ओटिएनोने 2021 मध्ये युगांडाविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने ड्युसेडित मुहुमुझा, केनेथ वायस्वा आणि बिलाल हसन यांना बाद केले.
19 – कोफी बागाबेना: घानाच्या कोफी बागाबेनाने 2021 मध्ये सेशेल्सविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने स्टीफन मदुसांका, मजहरुल इस्लाम आणि शिवकुमार उदयन यांना बाद केले.
20 – कर्टिस कान्फर: आयर्लंडच्या कर्टिस कान्फरने 2021 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने कॉलिन अकरमन, रायन टेन डौचेट, स्कॉट एडवर्ड्स आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे यांना सलग 4 चेंडूंमध्ये बाद केले.
21 – डायलन ब्लिग्नॉट: जर्मनीच्या डायलन ब्लिग्नॉटने 2021 मध्ये इटलीविरुद्ध हॅटट्रिक घेतली. त्याने जसप्रीत सिंग, जॉय परेरा आणि बलजीत सिंग यांना बाद केले.
22 – दिनेश नाक्राणी: युगांडाच्या दिनेश नाक्राणीने 2021 मध्ये सेशेल्सविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने पॉल बायरन, वडोदरा मुकेश आणि सोहेल रॉकेटला बाद केले.
23- पीटर अहो: नायजेरियाच्या पीटर अहोने 2021 मध्ये सिएरा लिओनविरुद्ध हॅट्रिक घेतली आणि अवघ्या 5 धावांत 6 बळी घेण्याचा विश्वविक्रमही केला. आहोने अबू कुमारा, मीनुरु केपाका आणि एड यांना लागोपाठ तीन चेंडूत माघारी घाडले होते.
24 – वानिंदू हसरंगा: 2021 टी20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने एडेन मार्कराम, टेम्बा बावुमा आणि ड्वेन प्रिटोरियस यांना बाद केले होते.
25 – कागिसो रबाडा: दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने 2021 टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध हॅट्रिक घेतली. त्याने ख्रिस वोक्स, ओएन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डनला बाद केले.
26 – हर्नान फेनल: अर्जेंटिनाच्या हर्नान फेनलने पनामा विरुद्ध 2021 मध्ये हॅट्रिक घेतली. त्याने महमुद जसत, अनिलकुमाप नातुभाई अहिर, दिनेशभाई अहिर यांना बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
“तो ‘हिट ओर मिस’ खेळाडू नाही”, गावसकरांच्या टीकेला ईशान किशनच्या माजी प्रशिक्षकांचे प्रत्युत्तर
रोहित, चहल, गप्टीलसह ‘हे’ खेळाडू भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यांत करू शकतात खास विक्रम