आयपीएल 2026 च्या हंगामामध्ये आतापर्यंत अर्ध्याहून अधिक सामने झाले असून फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पडत असला, तरी काही गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये (विशेषतः पहिल्या ओव्हरमध्ये) आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स)
जोफ्रा आर्चर (jofra Archer) या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली असून, आतापर्यंत या हंगामामध्ये त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.
मोहम्मद सिराज (गुजरात टायटन्स)
मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत त्याने हे स्थान पटकावले. सिराज या हंगामामध्ये गुजरातच्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
मोहम्मद शमी (लखनऊ सुपर जायंट्स)
लखनऊ सुपर जायंट्ससाठी मोहम्मद शमी (Mohmmed Shami) भेदक गोलंदाजी करत आहे. संघातील फलंदाज धावा करण्यासाठी संघर्ष करत असले, तरी शमीने आपल्या गोलंदाजीची धार कमी होऊ दिली नाही. त्याने या सीझनमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत.
प्रफुल्ल हिंगे (सनरायझर्स हैदराबाद)
हैदराबादचा वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगे या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 3 विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात प्रफुल्ल हिंगेने खळबळ माजवून दिली होती. त्याने पहिल्याच षटकामध्ये लुआन ड्री प्रीटोरियस, वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. विशेष म्हणजे हे तिन्ही फलंदाज शून्यावर (डक) बाद झाले.






