---Advertisement---

पीकेएल लिलावाच्या तिसऱ्या दिवशी अर्जुनवर पैशांचा पाऊस; पाहा बोली लागलेल्या खेळाडूंची यादी

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 12:44 PM
---Advertisement---

गेल्या कित्येक दिवसांपासून कबड्डी प्रेमींना प्रो कबड्डी लीगची आतुरता होती. आत्तापर्यंत प्रो कबड्डीचे ७ हंगाम पूर्ण झाले आहेत. पण गेल्या वर्षभरात कबड्डी वर्तुळात कोरोना व्हायरसच्या कारणाने शांतता होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाची घोषणा झाली आणि कबड्डी प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या ८ व्या हंगामासाठी २९, ३० आणि ३१ ऑगस्ट असे तीन दिवस खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

रविवार आणि सोमवारचा दिवस संपल्यानंतर लिलावाचा शेवटचा अर्थातच मंगळवारचा दिवसही (३१ ऑगस्ट) रोमांचक राहिला. भारताच्या ब गटातील कबड्डीपटूंमध्ये रेडर (Raider) अर्जुन देस्वाल याला सर्वात मोठी बोली लागली. मागील हंगामात यु मुम्बाचे प्रतिनिधित्व करणारा अर्जुन यंदा जयपूर पिंक पँथर्स संघाचा भाग असेल. त्यांनी अर्जुनला सर्वाधिक ९६ लाखांच्या किंमतीसह आपल्या ताफ्यात घेतले आहे. त्याच्यापाठोपाठ नितीन तोमरवर ६१ लाख, अजय ठाकूरवर ४६ लाख आणि जीव कुमारवर ४४ लाख अशा मोठ्या बोली लागल्या.

भारतीय खेळाडू (ब गट)
धर्मराज चेरलाथन – जयपूर पिंक पँथर्स (२० लाख)
जोगिंदर नरवाल – दबंग दिल्ली (२० लाख)
सुनील – पाटणा पायरेट्स (३१.५० लाख)
जीव कुमार – दबंग दिल्ली (४४ लाख)
रवी कुमार – हरियाणा स्टीलर्स (२७.५० लाख)
सुरेंद्र नाडा – हरियाणा स्टीलर्स (२० लाख)
नितीन तोमर – पुणेरी पलटन (६१ लाख)
मोरे जीबी – बेंगळुरू बुल्स (२५ लाख)
दीपक नरवाल – बेंगळुरू बुल्स (२६.५० लाख)
व्ही अजित कुमार – यू मुम्बा (२६ लाख)
सुकेश हेगडे – बंगाल वॉरियर्स (३० लाख)
नवीन बज्जाद – जयपूर पिंक पँथर्स (२२ लाख)
सोनू जगलान – गुजरात जायंट्स (२० लाख)
अर्जुन देस्वाल – जयपूर पिंक पँथर्स (९६ लाख)
सुमित सिंग – बंगाल वॉरियर्स (२० लाख)
अजय ठाकूर – दबंग दिल्ली (४६ लाख)

महत्त्वाच्या बातम्या-

पीकेएल लिलावाचा दुसरा दिवस विक्रमी, परदीप, सिद्धार्थ झाले ‘करोडपती’; पाहा बोली लागलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

कबड्डीपटू गिरीश इर्नाक आणि रिशांक देवदिगाच्या हाती निराशा, राहिले अनसोल्ड

रविंद्र पेहेलला लागली ७४ लाखांची बोली; ‘या’ संघाच्या ताफ्यात झाला सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---