भारतीय क्रिकेट संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवणारे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मोठा सन्मान मिळाला आहे. शास्त्री यांना आरपी-संजीव गोयनका समूहाने सुरू केलेल्या भारतीय क्रीडा सन्मान पुरस्कारांमध्ये (Indian Sports Honours) वर्षाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून निवडले गेले आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ वर्षाचा सर्वोत्कृष्ट संघ बनला आहे. जानेवारी ते डिसेंबर 2019 दरम्यानच्या कामगिरीच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे भारतीय क्रीडा सन्मान पुरस्कार पुढे ढकलण्यात आले होते. वेगवेगळ्या खेळांच्या 17 प्रकारात खेळाडूंना हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकाखाली भारतीय क्रिकेट संघ कसोटींमध्ये नंबर 1 ठरला आहे. त्याच बरोबर मागील काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळलीा होता. यावर्षी टी20 विश्वचषकानंतर प्रशिक्षकपदाचा त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.
भारतीय सलामीवीर रोहित शर्माला 2019 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. इंग्लंडमधील 2019 च्या विश्वचषकात रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. यात त्याने 9 सामन्यात 81 च्या सरासरीने 648 धावा केल्या होत्या. त्याने या स्पर्धेत 5 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले होते. एकाच विश्वचषकमध्ये 5 शतके ठोकणारा तो पहिला फलंदाजही ठरला आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त केएल राहुलला देखील भारतीय क्रीडा सन्मान पुरस्कार मिळाला आहे. खेळातील कौशल्य दाखविल्याबद्दल त्याला स्पिरिट ऑफ स्पोर्टचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
लेडी सेहवाग या नावाने प्रसिद्ध असलेली भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज शेफाली वर्मा देखील या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तिला महिलांच्या ब्रेकथ्रु परफॉरमेंस ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. शेफालीने 2019 मध्ये टी20 द्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. गेल्या महिन्यात इंग्लंड संघाविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यातून शेफालीने वनडे पदार्पणही केले होते. 17 वर्ष 150 दिवसांत तिने तीनही स्वरुपातील क्रिकेटमध्ये सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारी ती सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी कोणताही भारतीय पुरुष किंवा महिला खेळाडू हे करू शकले नाहीत.
शेफालीला अलीकडेच इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचीही संधी मिळाली होती. तिने दोन्ही डावात अर्धशतके झळकावत स्वत:ला सिद्ध केले होते. तिने 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 665 धावा केल्या आहेत. दरम्यान तिचा स्ट्राइक रेट 145 राहिला आहे. तिने तीन अर्धशतकेही ठोकली आहेत.
भारतीय क्रीडा सन्मानाच्या निर्णायक मंडळामध्ये पुलेला गोपीचंद, अभिनव बिंद्रा, योगेश्वर दत्त, महेश भूपती, पीटी उषा आणि अंजली भागवत यांचा देखील सहभाग होता. त्यांनी वेगवेगळ्या खेळांच्या 17 प्रकारातील खेळाडूंची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे.
भारतीय क्रीडा सन्मान पुरस्कारांची यादीः
2019 ची सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महिला खेळाडू – इला वलारीवन (2019 साठी)
2019 चा सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख पुरुष खेळाडू – दीपक पूनिया (2019 साठी)
2019 ची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू: राणी रामपाल
2019 चीइंडिविजुवल स्पोर्ट्सवुमैन ऑफ द ईयर : पीव्ही सिंधू
महत्त्वाच्या बातम्या-
वारं की अजून काही! फलंदाजाने शॉट मारण्यापुर्वीच स्टंप्सवरील बेल्स पडल्या खाली, पंचही थक्क
‘होय, तो शो टॉपर आहे’; पाहा स्वत: विस्फोटक फलंदाज असणाऱ्या सूर्यकुमारने कोणाचं केलंय इतकं कौतुक?
‘टीम इंडियाची प्रगती पाहून वाटतंय, आम्ही अजून २ संघ निवडून कोणतीही स्पर्धा जिंकू’