इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा विषय निघताच सर्वांमध्ये लपलेला क्रिकेटचा चाहता चटकन बाहेर येतो. त्याचबरोबर तो लगेचच आपल्या आवडीच्या संघाला सपोर्ट करण्यास सुरुवात करतो.
आयपीएल हे मनोरंजनाबरोबरच कमाईचेही क्षेत्र आहे. आयपीएलमध्ये अनेक मोठ्या उद्योगपतींपासून बॉलिवूड स्टार्सपर्यंत सर्वांनी गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या संघाची मालकी मिळविण्यासाठी या सर्वांनी बीसीसीआयला मोठी रक्कमही दिली आहे.
आयपीएल 2021चे संघ आणि त्यांचे मालक-
मुंबई इंडियन्स- नीता अंबानी
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची मालकीन नीता अंबानी या आहेत. ज्या भारताच्या सर्वात प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानींच्या पत्नी आहे. तरीही अधिकारिकरित्या पाहिले तर मुंबई इंडियन्सची मालकी रिलायंस इंडस्ट्रीजची आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- महेंद्र कुमार
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे मालक महेंद्र कुमार शर्मा आहेत. त्याचबरोबर महेंद्र कुमार हे युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचेही मालक आहेत. हा संघ महेंद्र कुमार यांनी उद्योगपती विजय मल्ल्याकडून विकत घेतला होता. या संघाचा कर्णधार विराट कोहली आहे.
दिल्ली कॅपिटल्स- जीएमआर आणि जेएसडब्ल्यू ग्रूप
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे मालक जेएसडब्ल्यू ग्रूप आणि जीएमआर ग्रुप आहेत. पार्थ जिंदाल हे या संघाचे प्रमुख आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार हा रिषभ पंत आहे. जुना कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने पंतच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चेन्नई सुपर किंग्स- एन. श्रीनिवासन
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचे मालक हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन आहेत. खरं तर चेन्नई सुपर किंग्सची मालकी इंडिया सिमेंट लिमिटेडकडे आहे आणि श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट लिमिटेडचे मालक आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 3 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. या संघाचा कर्णधार एमएस धोनी आहे.
किंग्स इलेव्हन पंजाब- प्रीती झिंटा आणि सुरेंद्र पॉल
किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाची मालकी चार व्यक्तींकडे आहे. यामध्ये सुरेंद्र पॉल, प्रीती झिंटा, नेस वाडिया आणि मोहित बर्मन यांचा समावेश आहे. या संघाचा कर्णधार केएल राहुल आहे.
कोलकाता नाईट रायडर्स- शाहरुख खान आणि जुही चावला
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा मालक बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आहे. त्याचबरोबर जूही चावला आणि तिचा पती जय मेहताही या संघाचे सहमालक आहेत. तसेच रेड चिलीज एंटरटेनमेंटकडेही या संघाची मालकी आहे. या संघाने आतापर्यंत आयपीएलचे 2 विजेतेपद पटकाविले आहे. या संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गन आहे.
राजस्थान रॉयल्स- मनोज बडाले आणि लचलन मुर्दोच
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे मालक मनोज बडाले आणि लचलन मुर्दोच आहेत. बडाले हे इमर्जिंग मीडिया कंपनीचेही मालक आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 1 विजेतेपद पटकाविले आहे. या संघाचा कर्णधार संजू सॅमसन आहे.
सनरायजर्स हैद्राबाद- कलानिथी मारन आणि सन टी.व्ही. नेटवर्क
सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचे मालक कलानिथी मारन आहेत. मारन हे सन टी.व्ही. नेटवर्कचेही मालक आहेत. हैद्राबादने आतापर्यंत आयपीएलचे 1 विजेतेपद पटकाविले आहे. या संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर आहे.
ट्रेंडिंग लेख-
रग्बी खेळाडू ते देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार : जाणून घ्या फाफ डू प्लेसिसबद्दल रंजक गोष्टी
१९९० मध्ये आयपीएल झाली असती तर ‘हे’ भारतीय खेळाडू झाले असते मालामाल