---Advertisement---

टी२० क्रिकेटमध्ये धोनीनंतर कोहलीच आहे ‘कॅप्टनकूल’, भारताला जिंकून दिलेत भरपूर सामने

On: शुक्रवार, सप्टेंबर 17, 2021 9:25 AM
Virat Kohli and MS Dhoni.jpg
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जवळजवळ गेल्या ६ वर्षांपासून भारतीय संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिन्ही स्वरूपात बऱ्याचशा मोठमोठ्या सामन्यात विजय मिळवले आहेत. परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवता येत नसल्याने त्याला कर्णधारपदावरून काढून टाका, ही मागणी जोर धरू लागली होती. अखेर या मागणीला आता पूर्णविराम लागला आहे. गुरुवारी (१६ सप्टेंबर) विराट कोहलीने स्वत: टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार म्हणून ही विराटची शेवटची स्पर्धा असणार आहे. कामाचा भार कमी व्हावा म्हणून विराटने हा निर्णय घेतला आहे. मात्र तो वनडे आणि कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदी कायम असेल. तसेच विराट कोहली नंतर टी-२० संघाचे कर्णधारपद रोहित शर्माला मिळू शकते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये जाऊन टी-२० मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात विजय मिळवण्याच्या बाबतीत विराट कोहली पाचव्या स्थानी आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४५ टी-२० सामने खेळले आहेत. यापैकी २७ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे.

तर या यादीत अव्वलस्थानी अफगाणिस्तानचा अजगर अफगान आहे. अफगानला ५२ टी-२० सामन्यांपैकी ४२ सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश आले आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी आहे. धोनीने ७२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. यापैकी ४१ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात यश आले होते.

आंतरराष्ट्रीय टी-२o क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार
४२ सामने – अजगर अफगान (५२ सामने)
४१ सामने – एमएस धोनी (७२ सामने)
३७ सामने – ओएन मॉर्गन (६४ सामने)
२९ सामने – सरफराज अहमद (३७ सामने)
२७ सामने – विराट कोहली* (४५ सामने)
२७ सामने – डॅरेन सॅमी (४७ सामने)

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितला भारताच्या टी२० संघाचे नेतृत्वपद मिळवण्याच्या शर्यतीत टक्कर देऊ शकतात ‘हे’ २ क्रिकेटर

रोहित शर्मा का व्हायला हवा भारताच्या टी२० संघाचा कर्णधार, ‘ही’ आहेत ३ महत्त्वाची कारणं

राजस्थान रॉयल्स मागची साडेसाती संपेना! आता ‘हा’ आक्रमक फलंदाजही जखमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---