इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलच्या 16व्या हंगामासाठीचा छोटा लिलाव 23 डिसेंबरला कोचीन येथे होणार आहे. या लिलावासाठी भारताबरोबरच विदेशातील 991 खेळाडूंनीही आपले नाव नोंदवले आहे. यातील 21 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीत एकाही भारतीय खेळाडूचे नाव नाही. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.
आयपीएल 2023च्या हंगामासाठी ज्या 21 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे, ते सर्व विदेशी खेळाडू आहेत. यामध्ये इंग्लंडचे सॅम करन (Sam Curran) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन, न्यूझीलंडचा कर्णधार आणि सनरायजर्स हैद्राबादचा माजी कर्णधार केन विलियम्सन आणि वेस्ट इंडिजचा निकलस पूरन इत्यादींचा समावेश आहे.
करनने नुकतेच ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. त्यामुळे त्याची मागणी वाढणार आहे. याआधी तो चार वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्जसोबत होता. तसेच ग्रीनकडेही सर्वाचे लक्ष असणार आहे.
या सर्व खेळाडूंवर कोचीन या ठिकाणी होणाऱ्या आयपीएल 2023च्या लिलावात बोली लागणार आहे. ज्या 991 खेळाडूंनी नोंद केली आहे, त्यापैकी 185 खेळाडू हे कॅप्ड आहेत, तर 786 खेळाडू अनकॅप्ड आहेत आणि संलंग्न देशाचे 20 खेळाडू सामील आहेत. या लिलावाच्या आधी 15 नोव्हेंबर पर्यंत सर्व 10 संघानी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे जमा केली. आयपीएल 2023च्या लिलावात 10 कॅप्ड भारतीय खेळाडू आणि 166 कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभाग घेणार आहेत.
आयपीएल 2023च्या लिलावासाठी मूळ किंमत 2 कोटी असलेले खेळाडू-
निकलस पूरन, कॅमरन ग्रीन, नॅथन कूल्टर-नाईल, ट्रेविस हेड, क्रिस लिन, टॉम बॅंटन, क्रिस जॉर्डन, टाइमल मिल्स, जेमी ओव्हरटन, क्रेग ओव्हरटन, सॅम करन, बेन स्टोक्स, केन विलियम्सन, जेम्स नीशम, आदिल रशीद, फिल सॉल्ट, एडम मिल्ने, राइली रुसो, रासी वॅन डर दुसेन, अँजलो मॅथ्यूज, जेसन होल्डर. List of Players with 2 crore base price IPL 2023
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
सामना जिंकूनसुद्धा चार वेळचा चॅम्पियन जर्मनीची विश्वचषकातून ‘एक्झिट’, जपान-स्पेन सुपर 16मध्ये





