आयपीएल 2025चा मेगा लिलाव संपला (IPL Mega Auction) सर्व संघांनी लिलावात आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करू शकतील अशा खेळाडूंना आपल्या संघात सामील केले आहे. पण आता चाहत्यांना आगामी आयपीएल हंगामाची नक्कीच आतुरता लागली असेल. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण आयपीएलमधील सर्व 10 संघाच्या संभाव्य कर्णधाराबद्दल जाणून घेऊया.
विराट कोहली (आरसीबी)- आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी, अशी अटकळ बांधली जात होती की, विराट कोहलीला (Virat Kohli) पुन्हा राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार बनवायचे आहे. त्याला बंगळुरूने 21 कोटी रूपयांमध्ये संघात कायम ठेवले. त्यामुळे तो आगामी आयपीएल हंगामात आरसीबीची धुरा सांभाळताना दिसू शकतो.
रूतुराज गायकवाड (सीएसके)- रूतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघानेही चांगली कामगिरी केली. आगामी हंगामासाठी रूतुराजला सीएसकेने 18 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले आहे.
हार्दिक पांड्या (एमआय)- आगामी आयपीएल हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) जाहीर केले आहे की, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल 2025 मध्ये संघाचे नेतृत्व करेल. त्याला एमआयनने 16.35 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले आहे.
श्रेयस अय्यर (पीबीकेएस)- पंजाब किंग्जने (Punjab Kings) मेगा लिलावात श्रेयस अय्यरसाठी (Shreyas Iyer) 26.75 कोटींची बोली लावली होती. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआर आयपीएल 2024चा चॅम्पियन बनला होता. आता आगामी आयपीएल हंगामात देखील अय्यर पंजाबचे नेतृत्व करताना दिसू शकतो.
रिषभ पंत (एलएसजी)- मेगा लिलावापूर्वी निकोलस पूरनला (Nicholas Pooran) कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र रिषभ पंतवर (Rishabh Pant) 27 कोटींची बोली लागल्यानंतर यावेळी लखनऊची कमान पंतच्या हाती येऊ शकते.
संजू सॅमसन (आरआर)- संजू सॅमसन (Sanju Samson) 2021 पासून राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार आहे. आयपीएल 2025 मध्येही तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. राजस्थानने त्याला 18 कोटी रूपयांमध्ये संघात कायम ठेवले आहे.
पॅट कमिन्स (एसआरएच)- पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखालील हैदराबाद संघाने आयपीएल 2024 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे आगामी हंगामात देखील तो हैदराबादच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसू शकतो. हैदराबादने त्याला 18 कोटींमध्ये आपल्या संघात कायम ठेवले आहे.
शुबमन गिल (जीटी)- आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कर्णधार म्हणून शुबमन गिल (Shubman Gill) फारसा यशस्वी ठरला नाही. असे असूनही, तो आयपीएल 2025 मध्ये गुजरातचे कर्णधारपद सांभाळताना दिसू शकतो.
केएल राहुल (डीसी)- लखनऊ सुपर जायंट्सचे (Lucknow Super Giants) कर्णधारपद सोडल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitlas) खेळणार आहे. रिषभ पंतच्या (Rishabh Pant) जाण्याने कर्णधारपदाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आगामी हंगामात राहुल दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळू शकतो.
रिंकू सिंह (केकेआर)- कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) बाबत संभ्रम आहे. एकीकडे रिंकू सिंहला (Rinku Singh) कर्णधार बनवण्याच्या अफवा आहेत. तर दुसरीकडे 23.75 कोटींना विकला गेलेला व्यंकटेश अय्यरही (Venkatesh Iyer) कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जच्या ‘या’ गोलंदाजाने गाजवले मैदान, घेतल्या 7 विकेट्स
IPL Mega Auction; यूपीचे ‘हे’ 8 क्रिकेटर लिलावात झाले मालामाल
ICC Champions Trophy; पाकिस्तानच्या जिद्दीमुळे आयसीसीचे होणार भारी नुकसान?