चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) बाबत आयसीसी आपला निर्णय कधी देणार याची संपूर्ण क्रिकेट जगताची प्रतीक्षा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) हे वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या 90 दिवस आधी सर्व सहभागी देशांच्या क्रिकेट बोर्डांना पाठवले जाईल याची खात्री करावी लागेल. पण भारत विरूद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील संघर्षादरम्यान एक नवीन अपडेट समोर आले आहे की, वेळापत्रकाला उशीर झाल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रसारकांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
क्रिकबझने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, वेळापत्रक जाहीर करण्याची अंतिम मुदत संपली आहे. यामुळे ब्रॉडकास्टर डिस्ने आणि जिओला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने प्रसारकांनाही या आगामी आयसीसी स्पर्धेचा लाभ घेता येणार नसल्याचे दिसते. आयसीसीने अद्याप व्यावसायिक मुद्द्यांवर कोणतेही विधान जारी केले नाही, परंतु हे निश्चित आहे की यजमान पाकिस्तान आणि विशेषत: प्रसारकांचे यामुळे नुकसान होत आहे.
भारत आणि पाकिस्तानला वेगळ्या गटात ठेवण्याच्या निर्णयाला ब्रॉडकास्टर विरोध करत असल्याचे याच रिपोर्टनुसार समोर आले आहे. पण दोन्ही देशांना वेगवेगळ्या गटात ठेऊन पाकिस्तान आपले सर्व सामने आपल्या देशात खेळू शकतो, तर भारताविरूद्धचे सामने इतर देशांमध्ये होऊ शकतात. दोघांनाही एकाच गटात ठेवले तर एकाला दुसऱ्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल.
आयसीसी (29 नोव्हेंबर) रोजी एक बैठक आयोजित करणार आहे, ज्यामध्ये हायब्रीड मॉडेलवर मोठा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान यजमानपद सोडण्यावर आणि हायब्रीड मॉडेल न स्वीकारण्यावर ठाम असल्याने, दुसरीकडे भारताला कोणत्याही परिस्थितीत आपला संघ पाकिस्तानात पाठवायचा नाही. जर पीसीबीने हायब्रीड मॉडेल स्वीकारले नाही, तर आयसीसीला पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद काढून घेण्यास भाग पाडले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
“11 अविश्वसनीय वर्षांनंतर….”, हैदराबादपासून वेगळे झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारची भावुक पोस्ट
“खेळ तुम्हाला धडा शिकवतो…”, पृथ्वी शाॅबाबत रिकी पाँटिंगचे मोठे वक्तव्य!
IPL 2025; पाकिस्तानपाठोपाठ बांग्लादेशचाही आयपीएलमधून सफाया? एकाही खेळाडूवर बोली नाही