18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाचे तिसरे सराव शिबिर 12 जूनपासून सुरू होणार आहे. या शिबिरासाठी खेळाडूंची आणि प्रशिक्षकांची नावे जाहिर झाली आहेत.
येत्या 15 जूनला एशियन गेम्स 2018 साठी पुरुष कबड्डी संघाची तर 17 जूनला महिला संघाची निवड होणार आहे. त्यादृष्टीने हे शिबिर महत्त्वाचे मानले जात आहे.
पुरुष खेळाडूंचे सराव शिबिर 12 जून ते 20 जून असे असेल. तसेच महिला खेळाडूंचे सराव शिबिर 12 जून ते 1 जुलै पर्यंत असणार आहे.
पहिले सराव शिबीर 15 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान पार पडले होते. त्यात 42 संभाचा समावेश होता. त्यानंतर 15 मे ते 5 जून या काळात दुसरे सराव शिबीर पार पडले.
या सराव शिबिरासाठी गिरिश मारुती एर्नाक, निलेश साळुंखे, रिशांक देवाडिगा, सचिन बाळकृष्ण शिंगाडे आणि विकास काळे या महाराष्ट्राच्या 5 पुरुष खेळाडूंची निवड झाली आहे.
महिलांमध्ये अभिलाषा म्हात्रे, सायली केरीपाळे, सायली जाधव आणि स्नेहल शिंदे या महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंची निवड झाली आहे.
यातील राष्ट्रीय स्पर्धेत आणि फेडरेशन कप स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या सोनाली शिंगटेच्या निवडीबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. तसेच महिला संघामध्ये कोणत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना संधी मिळते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
पुरुषांच्या संघात जास्त बदल होणार नाही असे मानले जात आहे. या संघाचे कर्णधारपद अजय ठाकूरकडे कायम ठेऊन महाराष्ट्राच्या गिरिश मारुती एर्नाक आणि रिशांक देवाडिगाची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
दर 4 वर्षांनी होणारी एशियन गेम्स स्पर्धा खेळाडूंसाठी मोठी संधी मानली जाते. त्यामुळे एशियन गेम्ससाठी महाराष्ट्रातील कोणते कबड्डीपटू भारतीय संघात स्थान मिळवतात हे पहावे लागेल.
सराव शिबीरासाठी निवड झालेल्या खेळांडूंची नावे (पुरुष):
1. सी मनोज कुमार – आंध्र प्रदेश
2. अमित नागर – दिल्ली
3. अशिष सांगवान – हरियाणा
4. संदिप – हरियाणा
5. सुरेंदर – हरियाणा
6. अजय ठाकुर – हिमाचल प्रदेश
7. विशाल भारद्वाज – हिमाचल प्रदेश
8. मनजित चिल्लर – भारतीय रेल्वे
9. मोहित चिल्लर – भारतीय रेल्वे
10. सुखेंद्र हेगडे – कर्नाटक
11. गिरिश मारुती एर्नाक – महाराष्ट्र
12. निलेश साळुंखे – महाराष्ट्र
13. रिशांक देवाडिगा – महाराष्ट्र
14. सचिन बाळकृष्णा शिंगाडे – महाराष्ट्र
15. विकास काळे – महाराष्ट्र
16 मनिंदर सिंग – पंजाब
17 दिपक – राजस्थान
18 राजू लाल चौधरी – राजस्थान
19 सचिन – राजस्थान
20 मनू गोयत – सेनादल
21 नितिन तोमर – सेनादल
22 रोहित कुमार – सेनादल
23सुरजीत – सेनादल
24 नितेश – सेनादल
25 रणजीत चंद्रन – तमिळनाडू
26 मालेश गंगाधरी – तेलंगणा
27 राहुल चौधरी – उत्तर प्रदेश
28 परदिप – उत्तराखंड
प्रशिक्षक:
1 बलवंत सिंग(राष्ट्रीय प्रशिक्षक)
2 रामबिर सिंग खोखार
3 राम मेहेर सिंग
4 श्रीनिवास रेड्डी
खेळांडूंची नावे (महिला):
1 वारा मणिकाय दुर्ग कोडेला – आंध्र प्रदेश
2 शामा परविन – बिहार
3 रामशिला डुग्गा – छत्तीसगड
4 मधू – दिल्ली
5 कविता देवी – हरियाणा
6 प्रियांका – हरियाणा
7 साक्षी कुमारी – हरियाणा
8 कविता – हिमाचल प्रदेश
9 ललिता – हिमाचल प्रदेश
10 प्रियांका नेगी – हिमाचल प्रदेश
11 मारिया मौनीका मंडाला – भारतीय रेल्वे
12 पायेल चौधरी – भारतीय रेल्वे
13 रितू नेगी – भारतीय रेल्वे
14 सोनाली शिंगाटे – भारतीय रेल्वे
15 उषा रानी – कर्नाटक
16 विद्या व्ही – केरळ
17 अभिलाशा म्हात्रे – महाराष्ट्र
18 सायली केरीपले – महाराष्ट्र
19 सायली जाधव – महाराष्ट्र
20 स्नेहल शिंदे- महाराष्ट्र
21 रणदिप कौर खेहरा – पंजाब
22 मनप्रित कौर – राजस्तान
23 दिपिका – राजस्तान
24 शालिनी पाठक – राजस्तान
25 जिविता सबरमानिया – तमिळनाडू
26 नौशिन शेख – तेलंगणा
27 अम्रेश – उत्तर प्रदेश
28 मिता पाल – पश्चिम बंगाल
प्रशिक्षक:
1 बलवंत सिंग(राष्ट्रीय प्रशिक्षक)
2 बनानी सहा
3 दमयंती बोरो
4 तेजस्वीनी बाई
महत्त्वाच्या बातम्या-
–कबड्डी चाहत्यांसाठी खुषखबर, या चॅनेलवर पहा कबड्डी मास्टर्स दुबईचे सामने!
–संपुर्ण वेळापत्रक- कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८चे संपुर्ण वेळापत्रक
-कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये दोन सामने