प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगच्या १३ हंगामांच्या इतिहासात डोकावून पाहिले तर २००८-१० या हंगामात सामन्यांचे स्वरुप वेगळे होते. या तीन हंगामात साखळी फेरी सामने, त्यानंतर उपांत्य फेरी सामने आणि शेवटी अंतिम सामना खेळला गेला होता. मात्र आयपीएल २०११ पासून या स्वरुपात बदल झाले. त्यानुसार अंतिम सामन्यात पोहोण्यापुर्वी संघांना पहिला आणि दूसरा क्वालिफायर सामना खेळावा लागतो.
पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुणतालिकेतील टॉप-२ संघ आमनेसामने येतात. या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतो. तर पराभूत संघाला दूसऱ्या क्वालिफायर सामन्यात पुन्हा नशीब आजमावण्याची संधी मिळते. तर गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांमध्ये इलिमिनेटर सामना होता. यात पराभूत झालेला संघ हंगामातून बाहेर पडतो. त्यानंतर दूसऱ्या क्वालिफायर सामन्यात विजेता इलिमिनेटर आणि पहिला पराभूत क्वालिफायर संघ खेळतात. त्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतो.
सोमवारी (२ नोव्हेंबर) अबु धाबीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा सामना झाला. या सामन्यात दिल्लीने ६ विकेट्सने बाजी मारत गुणतालिकेत दूसरे स्थान पटकावले. त्यामुळे आता ५ नोव्हेंबर रोजी दिल्ली विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात आयपीएल २०२०चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे.
त्यानिमित्ताने जाणून घेऊया, आयपीएल २०११ पासून ते आयपीएल २०२० पर्यंत कोणकोणत्या दोन संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना झाला आहे.
पहिला क्वालिफायर सामना
२०११- बेंगलोर विरुद्ध चेन्नई
२०१२- कोलकाता विरुद्ध दिल्ली
२०१३- चेन्नई विरुद्ध मुंबई
२०१४- पंजाब विरुद्ध कोलकाता
२०१५- चेन्नई विरुद्ध मुंबई
२०१६- गुजरात विरुद्ध बेंगलोर
२०१७- मुंबई विरुद्ध पुणे
२०१८- हैदराबाद विरुद्ध चेन्नई
२०१९- मुंबई विरुद्ध चेन्नई
२०२०- मुंबई विरुद्ध दिल्ली
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ इझ बॅक! नेट्समध्ये जोरदार फटकेबाजी करत रोहितची निवडकर्त्यांना चपराक, पाहा व्हिडिओ
पाहा कोणते ३ संघ ठरले आयपीएल प्ले ऑफसाठी पात्र? कोणत्या २ संघांना आहे संधी?
मुंबईचा ‘हा’ हुकमी एक्का लवकरच टीम इंडियात, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?