नवी दिल्ली | युनाइटेड अरब अमिरात (यूएई) येथे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. कोव्हिड 19 या साथीच्या आजारामुळे प्रेक्षकांना मैदानात प्रवेशबंदी होती. मात्र असे असूनही खेळाडूंच्या उत्साहात कसलीही उणीव जाणवली नाही. दरवर्षीप्रमाणे या हंगामातही चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. या लेखात आपण कोणत्या संघाने किती षटकार मारले याची माहिती पाहाणार आहोत.
• आयपीएलच्या 13 व्या हंगामात प्रत्येकच संघाने लांबलचक षटकार मारण्यात कोणतीही कसर सोडली नाही. परंतु, ज्या संघाकडून सर्वाधिक षटकार ठोकले गेले, तो संघ म्हणजे मुंबई इंडियन्स होय. आयपीएल 2020 चे विजेतेपद जिंकणार्या मुंबईने या हंगामात एकूण 137 षटकार ठोकले.
• राजस्थान रॉयल्स या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. अर्थात राजस्थानच्या संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले नाही, परंतु या संघातील खेळाडूंनी मोठे फटके मारण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी एकूण 105 षटकार मारले.
• किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. या संघाने एकूण 98 षटकार ठोकले आहेत.
• या हंगामातील उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्सने एकूण 88 षटकार ठोकत चौथे स्थान मिळवले आहे.
• कोलकाता नाईट रायडर्सने 86 षटकार ठोकत या यादीत पाचवे स्थान पटकावले.
• दुसऱ्या क्वालिफायार सामन्यात पराभूत झालेला संघ सनरायझर्स हैदराबादने 79 षटकार ठोकत या यादीत 6 वे स्थान पटकावले.
• भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने 13 व्या हंगामात एकूण 75 षटकार ठोकले. त्यामुळे हा संघ सातव्या स्थानावर आहे.
• भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी या हंगामात षटकार ठोकण्याच्या बाबतीत तळाशी आहे. या संघाने एकूण 66 षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘म्हणलं होतं मामू यांचं गणित कमजोर आहे’, मुंबईच्या विजयानंतर रोहितकडून जुना व्हिडिओ शेअर
‘ड्वेन ब्रावो तू आता माझ्या मागे राहिलास’, असे का म्हणाला पोलार्ड, घ्या जाणून
‘या’ दोन युवा भारतीय क्रिकेटर्सचा फॅन झाला ब्रेट ली; म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
‘त्या’दिवशी कोणत्याही खेळाडूला आवडणार नाही अशा पद्धतीने बाद झाला विराट कोहली
ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण