भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा त्याच्या काळातील एक अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. आपल्या तुफानी आणि आक्रमक फलंदाजीने त्याने भारतीय संघाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. तसेच मोक्याच्या क्षणी उपयुक्त फिरकी गोलंदाजी देखील करत त्याने विजयात योगदान दिले आहे.
मात्र युवराज मैदानावरील कामगिरीने जितका चर्चेत असायचा तितकाच मैदानाबाहेर देखील चर्चेत असे. युवराजची इमेज एक चॉकलेट बॉय म्हणून देखील होती. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसह त्याचे अफेअर्स असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या लेखात आपण अशाच सहा अभिनेत्रींची माहिती घेऊया, ज्यांच्या सोबत युवराजचे नाव जोडल्या गेले होते.
१) किम शर्मा – ‘मोहब्बतें’ या सिनेमा द्वारे अभिनेत्री किम शर्मा प्रसिध्दीच्या झोतात आली होती. युवराज आणि किम शर्माचे अफेअर जवळपास चार वर्ष चालू होते. पण २००७ साली हे दोघे वेगळे झाले. असे म्हंटले जाते की युवराजच्या आईचा या नात्याला विरोध असल्याने ते विभक्त झाले होते.
२) दीपिका पदुकोण – दीपिका पदुकोण आज बॉलीवूड मधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. २००७ साली तिचे युवराजचे अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. २००७च्या टी२० वर्ल्डकपवेळी दीपिका युवराजला चीयर करतांना दिसून आली होती. तिने युवराजसाठी वाढदिवसाची मोठी पार्टी देखील आयोजित केली होती.
३) मिनीषा लांबा – मिनीषा लांबा आणि युवराज सिंग यांचे अफेअर असल्याच्या चर्चा देखील एकेकाळी रंगल्या होत्या. या दोघांचा किस करतांनाचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. पण मिनीषा लांबाने या वृत्ताचा इन्कार करत सदर फोटोतली व्यक्ती दुसरीच कोणीतरी असल्याचा दावा केला होता.
४) नेहा धूपिया – साल २०१४ मध्ये युवराज सिंग आणि नेहा धूपिया यांची भेट सोफी चौधरीच्या वाढदिवसाच्या पार्टी मध्ये झाली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र नेहाने या गोष्टीचा इन्कार केला होता.
५) रिया सेन – युवराज सिंग आणि रिया सेन यांची भेट देखील एका पार्टीतच झाली होती. या पार्टीत दोघेही एकमेकांवरील नजर हटवू शकत नव्हते. याशिवाय या दोघांचा एकमेकांचा हात धरलेला फोटो देखील समोर आला होता. ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना खतपाणी मिळाले होते.
६) प्रीति झिंटा – बॉलीवूड अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण प्रीति झिंटा आणि युवराज सिंग यांच्या अफेअरची एकेकाळी जोरदार चर्चा झाली होती. अनेक वृत्तसंस्थांनी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. आयपीएल दरम्यान या दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याच्या फोटोंमुळे या चर्चेला अजून हवा मिळाली होती. मात्र प्रीति झिंटाने या वृत्तांचा इन्कार केला होता.