बांगलादेश क्रिकेट संघाला एक मोठा झटका बसला. त्यांचा नियमित वनडे कर्णधार तमिम इक्बाल याने तडकाफडकी निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला. अफघाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिका सुरू असताना तमिमने हा निर्णय घेतल्याने संघाची चांगलीच अडचण झाली होती. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने तत्काल शुक्रवारी (7 जुलै) लिटन दार याला संघाचा कर्णधार नियुक्त केले.
तमिम इक्बाल (Tamim Iqbal) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांगलादेश क्रिकनेट वनडे संघाचे कर्णधारपद लिटन दास (Litton Das) याच्याकडे सोपवले. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पुढचे दोन्ही सामने लिटन दास याच्या नेतृत्वात खेळले जातील.
वनडे संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर लिटन दास म्हणाला, “जर मला दुखापत झाली, तर संघाला माझी तिककी आठवण येणार नाही, जितकी आम्हाला त्याची (तमिम उक्बाल) आठवण येणार आहे. हे क्रिकेट आहे आणि संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी युवा खेळाडू येत आहेत. एक दिवस आम्हालाही संघ सोडावा लागणार आहे. सध्या तमिम आमच्यासोबत नाहीय, अशात त्याच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाहीये. त्याने जो निर्णय घेतला, तो आम्हा सर्वांसाठीच धक्कादायक होता. आमच्यापैकी कोणालाच अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती.’
बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेचा पहिला सामना बुधवारी (5 जुलै) अफगाणिस्तानने जिंकला. या सामन्यातील परभवानंतर तमिम इक्बालने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 8 आणि 11 जुलै रोजी खेळला जाणार आहे. या दोन्ही सामन्यांसाठी लिटन दार याला कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे. भविष्यातही आता तोच बांगलादशचा कर्णधार राहिली, अशे सांगितले जात आहे. तरी बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून याविषयी कुठलीच घोषणा केली गेली नाहीये. शाकिब अल हसन बांगलादेशचा कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार आहे. अशात लिटन दास वनडे संघाचे कर्णधारपद चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. (Litton Das has been announced as the captain of Bangladesh for the remainder of the ODI series against Afghanistan)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
रिंकूच्या चाहत्यांनो खचू नका, भारतीय संघाच्या ‘या’ दौऱ्यात विस्फोटक फलंदाजाला मिळणार संधी!
BREAKING: वर्ल्डकपआधी बांगलादेशला जबर धक्का! कर्णधार तमिम इक्बालची तडकाफडकी निवृत्ती