अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी शुक्रवारपासून (दि. 29 सप्टेंबर) सराव सामन्यांना सुरुवात झाली. पहिल्या दिवशी तीन सामने खेळले गेले. त्यात बांगलादेश आणि न्यूझीलंड या दोन संघांनी विजय मिळवला. तसेच, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान संघातील दुसरा सामना रद्द झाला. आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. 30 सप्टेंबर) चौथ्या सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड संघ भिडणार आहेत. हे सराव सामने अधिकृत नाहीयेत. अशात दोन्ही संघ अधिकाधिक खेळाडूंचा उपयोग करू शकतात. मात्र, कोणताही संघ या सामन्यात आपल्या रणनीतीचा खुलासा करणे टाळण्याचा प्रयत्न करेल.
इंग्लंड संघाने मागील काही वर्षांपासून तिन्ही क्रिकेट प्रकारातील आपली रणनीती बदलली आहे. तसेच, त्यांच्याकडे मजबूत फलंदाजी क्रम आहे. त्यात जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, डेविड मलान, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मोईन अली यांसारख्या स्टार फलंदाज कोणतेही आक्रमण उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगतात. अशात भारतीय गोलंदाजांनाही या सामन्याद्वारे स्वत:ला पारखण्याची संधी मिळेल.
अशात या सामन्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील सराव सामना कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील सामना गुवाहाटी येथे खेळला जाईल.
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील सराव सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील सराव सामन्यात नाणेफेक केव्हा होईल?
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील सामन्यात 1.30 वाजता नाणेफेक होईल.
भारत विरुद्ध इंग्लंड सराव सामन्याचे लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील सराव सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्सचे चॅनेल स्टार स्पोर्ट्स, स्टार स्पोर्ट्स एचडी1 आणि स्टार स्पोर्ट्स एचडी2वर पाहता येईल. तसेच, भारत विरुद्ध इंग्लंड सराव सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. विश्वचषकातील सर्व सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टारवर मोफत पाहता येईल. (live streaming india vs england warm up match where to watch live streaming world cup 2023 know here)
हेही वाचा-
वेलकम बॅक कॅप्टन! वर्ल्डकपआधी सराव सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सने विजय
श्रीलंकेवर भारी पडली बांगलादेशची फलंदाजी, कर्णधार शाकिब नसताना संघाचा मोठा विजय