इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) उर्वरित चौदावा हंगाम १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू होणार आहे. या हंगामाच्या तयारीला आता सर्व फ्रेंचायझी लागल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या मालकीचे काही समभाग एका प्रसिद्ध फुटबॉल क्लबला विकले असून, राजस्थान संघामध्ये आता काही महत्त्वपूर्ण बदल घडतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या फुटबॉल क्लबने विकत घेतले समभाग
पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या मालकीपैकी १५% समभाग प्रसिद्ध इंग्लिश फुटबॉल क्लब लिव्हरपूल व बोस्टन रेड सॉक्स संघाचे सहमालक रेडबर्ड कॅपिटल्स यांना विकले आहेत. हा सौदा २५ कोटी डॉलर्स ते ३० कोटी डॉलर्स दरम्यान असण्याचा अंदाज लावला जात आहे.
संघमालकांनी दिली अशी प्रतिक्रिया
राजस्थान रॉयल्स संघातील सर्वधिक समभाग ज्यांच्याकडे आहेत त्या मनोज बडाले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘अशा प्रकारची गुंतवणूक आणि भागीदारी आयपीएलची वैश्विक लोकप्रियता दर्शवते.’ मनोज बडाले यांची गुंतवणूक फर्म एमर्जिंग मीडिया ही राजस्थान रॉयल्स संघाची मूळ मालक आहे.
रेडबर्ड कॅपिटलचे संस्थापक व कार्यकारी संचालक कर्डीनाले यांनी या गुंतवणूकीनंतर बोलताना म्हटले, ‘आयपीएल ही सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे, ज्यांचे सर्वाधिक चाहते पाहायला मिळतात.’
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचीदेखील राजस्थान रॉयल्स संघात थोडीशी भागीदारी आहे.
पहिल्या आयपीएलचा विजेता आहे राजस्थान संघ
राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा विजेता होता. मात्र, त्यानंतर संघाला एकदाही स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली नाही. २०१३ व २०१५ मध्ये त्यांनी तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. सध्या संघाचे नेतृत्व भारताचा युवा फलंदाज संजू सॅमसन हा करतो. आयपीएल २०२१ मध्यावर स्थगित झाले तेव्हा राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
मिताली राजची ऐतिहासिक कामगिरी! सचिननंतर ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली क्रिकेटपटू
रैनाचा नाही बॉलीवूड अभिनेत्यांवर विश्वास? बायोपिकसाठी सूचविली ‘ही’ दक्षिण भारतीय नावं
“भारतीय चाहत्यांमध्ये खेळभावनेची कमतरता” विश्वविजेत्या खेळाडूने उपटले भारतीय क्रिकेटप्रेमींचे कान