आयपीएल 2025 मधील चाैथा सामना काल (25 मार्च) खेळला गेला, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमने सामने होते. हा सामना दिल्लीच्या होम ग्राऊंड विशाखापट्टणम येथे झाला. या थराथरक सामन्यात दिल्लीने 1 विकेटने बाजी मारली. 210 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने अशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांच्या आक्रमक खेळीने 19.3 षटकांत सामना जिंकला.
टाॅस गमावून प्रथम फलंदाजी करण्याऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने मार्यादित 20 षटकात 209 धावा केल्या. ज्यात मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी अर्धशतकी खेळी खेळली. लखनऊकडून सलामीला आलेल्या मार्करम आणि मार्शच्या जोडीने 46 धावा जोडल्या. यांनतर चाैथ्या षटकाच्या चाैथ्या चेंडूवर मार्करमच्या रुपाने संघाला पहिला धक्का बसला, तो 15 धावा काढून बाद झाला, यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या निकोलस पूरनने वादळी खेळी खेळली.
6, 6, DROPPED, 6! ????
— Star Sports (@StarSportsIndia) March 24, 2025
A tough start for debutant Vipraj Nigam as he conceded a 25-run over against Pooran & Marsh! ????
Watch LIVE action: https://t.co/mQP5SyTHlW#IPLonJioStar ???? #DCvLSG | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/9g3GOI0wVl
खेळपट्टीवर उतरताच पूरनने क्षणाचाही विलंब न करता आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. त्याने 30 चेंडूत 75 धावा कुटल्या. ज्यात त्याने 6 चाैकार आणि 7 षटकर हणल्या, शिवाय ट्रिस्टन स्टब्सच्या एका षटकात त्याने 28 धावा खेचल्या. मधल्याफळीत निकोलस पूरनची ही खेळी संघासाठी निर्णायक ठरली, ज्यामुळे संघ 200+ धावांचा टप्पा पार करु शकला. पूरनशिवाय मिचेल मार्शने 36 चेंडूत 72 धावा केल्या.
6,6,6,6,4 BY NICHOLAS POORAN AGAINST STUBBS ???? pic.twitter.com/wFHeSD51kz
— Johns. (@CricCrazyJohns) March 24, 2025




