काहीदिवसांपूर्वीच क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्स याने शनिवारी (१४ मे) जगाचा निरोप घेतला. त्याचा शनिवारी रात्री कार अपघात झाला. त्यातच सायमंड्सला आपले प्राण गमवावे लागले. तो ४६ वर्षांता होता. दरम्यान, सायमंड्सचे कारवरील नियंत्रण कसे सुटले किंवा हा अपघात कसा झाला, हे स्पष्ट झाले नाही. पण एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड राज्यातील टाऊन्सविल शहरात सायमंड्सचा (Andrew Symonds) अपघात (Car Accident) झाला. या अपघातानंतरची परिस्थिती तेथील स्थानिक नागरिक वेलन टाऊनसन यांनी ऑस्ट्रेलियातील नाईन नेटवर्कशी बोलताना सांगितली. त्यांनी सांगितले की, सायमंड्सला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला होता.
टाऊनसन यांनी सांगितले, ‘तो (सायमंड्स) तिथेच अडकला होता. त्यामुळे मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मी त्याला सीपीआर दिला आणि त्याची नाडीही तपासत होतो. पण, मला त्याच्याकडून खूप प्रतिक्रिया मिळत नव्हत्या.’
यापूर्वी सायमंड्सच्या निधनाबद्दल माहिती देताना स्थानिक पोलिसांनीही सांगितले होते की, आपत्कालिन सेवेकडून सायमंड्सला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, त्यांनाही अपयश आले.
सायमंड्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
सायमंड्सने १९९८ साली ऑस्ट्रेलियाकडून वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचे २००४ मध्ये कसोटी आणि २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण झाले. त्याने २६ कसोटी सामने खेळले असून १४६२ धावा केल्या, तसेच २४ विकेट्स घेतल्या. त्याने कसोटीत २ शतके आणि १० अर्धशतके केली.
तसेच त्याने १९८ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५०८८ धावा केल्या असून १३३ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याच्या नावावर ६ शतके आणि ३० अर्धशतके आहेत. त्याचबरोबर त्याने १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले, ज्यात त्याने २ अर्धशतकांसह ३३७ धावा केल्या आणि ८ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
प्लेऑफच्या शर्यतीत संघ असतानाच कर्णधार मायदेशी रवाना, हैदराबादच्या ताफ्यात गडबड
मोठ्या मनाचा माही! १६ वर्षीय चाहत्याच्या खास पत्राचे ‘कॅप्टनकूल’ धोनीकडून ‘या’ शब्दात कौतुक
महिला क्रिकेटविश्वात निर्विवाद सत्ता गाजवतायेत ऑस्ट्रेलियाच्या रणरागिणी