---Advertisement---

VIDEO: भारताविरुद्ध हिट विकेट घेण्यात ‘या’ किवी गोलंदाजाचा हातखंडाच! श्रेयस अय्यरच्या आधी…

On: रविवार, नोव्हेंबर 20, 2022 4:58 PM
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट पुरूष संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दोन संघामध्ये टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) माऊंट मॉन्गुई येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. या सामन्यात भारताने सूर्यकुमार यादव याच्या नाबाद 111 धावांच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 191 धावसंख्या उभारली. हा सामना न्यूझीलंडने 65 धावांनी गमावला असला तरी लॉकी फर्ग्युसन याने महत्वाचा विक्रम नोंदवला आहे.

झाले असे की, या सामन्यात भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा विचित्र पद्धतीने हिट विकेट झाला. यासह टी20 मध्ये तो हिट विकेट होणारा तो चौथा भारतीय ठरला. तसेच यातील दोन खेळाडूंना तर एकट्या लॉकी फर्गयुसन (Lockie Ferguson)
यानेच गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीवर अय्यर बरोबरच हर्षल पटेल हा पण हिट विकेट या पद्धतीने बाद झाला होता.

मागील वर्षी न्यूझीलंड संघ जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्यातील कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात हर्षल असा बाद झाला होता. तेव्हा हर्षल 11 चेंडूत 18 धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये हिट विकेट पद्धतीने बाद होणारे आणखी दोन भारतीय फलंदाज आहे. त्यामध्ये भारतासाठी सर्वप्रथम केएल राहुल (KL Rahul) 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अशा पद्धतीने बाद झालेला. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातही अखेरच्या चेंडूवर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच पद्धतीने बाद झालेला.

https://twitter.com/VinodNa66839310/status/1594241376056934400?s=20&t=UQQfJye3LQ1K34toyak9rQ

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही उत्तम कामगिरी केली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमार याने फिन ऍलन याला बाद करत यजमान संघाला धक्का दिला. त्यानंतर न्यूझीलंडच्या काही अंतराने विकेट पडतच राहिल्या कर्णधार केन विल्यमसन एक बाजू लढवत होता. त्याने 52 चेंडूत 61 धावा केल्या आणि 18व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो बाद झाला.

यावेळी दीपक हुडा याने फलंदाजी नाही तर गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. त्याने 2.5 षटकात 10 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. Lockie Ferguson’s Hit Wickets in International T20 Cricket vs India

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भुवी आणि पहिल्या ओव्हरच नातचं खास! विरोधी फलंदाजाची शिकार करणार म्हणजे करणारच
न्यूझीलंडविरुद्ध 32 चेंडूत अर्धशतक, पुढच्या 17 चेंडूत शतक; सूर्यकुमार यादवने लावली विक्रमांची रांग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---