ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषकाचा थरार राहणार आहे. क्रिकेट जगतातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होतील. यापैकी एक संघ हा सहयोगी देशांचा आहे. तो संघ नेदरलँड्स असून, इथपर्यंत मजल मारण्याकरता त्यांनी कशा प्रकारचा संघर्ष केला हे नेदरलँड्सचा अष्टपैलू लोगन वॅन बीक याने सांगितले.
झिम्बाब्वे येथे जून महिन्यात वनडे विश्वचषकाची पात्रता फेरी दहा संघाच्या या स्पर्धेतून दोन संघ मुख्य विश्वचषकासाठी पात्र ठरणार होते. यामध्ये श्रीलंकेने अखेरपर्यंत अजिंक्य राहून आपली जागा पक्की केली. तर, दुसरीकडे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना वेस्ट इंडीज, आयर्लंड व झिम्बाब्वे या प्रमुख संघांना पराभूत करत नेदरलँड्सने विश्वचषकात आपली जागा पक्की केली. मात्र, इथपर्यंत येण्याचा त्यांचा प्रवास हा सोपा नसल्याचे बीक याने एका मुलाखतीत सांगितले. तो म्हणाला,
“नेदरलँड्समध्ये क्रिकेटसाठी तितके पोषक वातावरण नाही. सध्या केवळ तीन खेळाडू करारबद्ध आहेत. तिथे सरावासाठी दोन टर्फ विकेट मिळतील. बरेच खेळाडू पूर्णवेळ नोकरी करतात. त्यातीलही निम्म्याहून अधिक हे कंत्राटी पद्धतीने काम करतात. दोघांनी आत्ताच आपली शाळा पूर्ण केली आले. तुम्हाला सराव करायचा असेल तर मॅट विकेटवरच करावा लागतो.”
नेदरलँड्स संघ मागील वेळी विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नव्हता. मात्र, यावेळी काही युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी करत संघाला विश्वचषकापर्यंत पोहोचवले. स्वतः बीक हा न्यूझीलंडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर नेदरलँड्ससाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.
(Logan Van Beek Tell Story Of Netherlands Cricket Team Struggle)
हेही वाचा-
आयर्लंड दौरा गाजवत असलेल्या बुमराह-प्रसिद्धविषयी भारतीय प्रशिक्षकाचे विधान; म्हणाला, ‘विश्वचषकापूर्वी…’
शंभर चेंडूंच्या लीगमध्ये फलंदाज बनला रिंकू सिंग; 5 चेंडूत ठोकले 5 जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ






