---Advertisement---

‘हमारी भाभी कैसी हो’, चाहत्यांनी सूर लावताच विराटने गिलपुढे दिली ‘अशी’ रिॲक्शन; व्हिडिओ पाहिला का?

Shubman Gill Virat Kohli
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात विराट कोहली चर्चेत राहिला. फलंदाजी करताना विराटने अवघ्या 119 चेंडूत शतक केले. वनडे क्रिकेटमधील हे त्याचे 49 वे शतक असून सचिन तेंडुलकच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. विराटचा क्षेत्ररक्षण करतानाचा एक व्हिडिओ सद्या तुफान व्हायल होत आहे.

विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात 121 चेंडूत 101* धावांची खेळी केली. त्याने सचिन तेंडुलकर याच्या 49 वनडे शतकांची बोरबरी केली. विश्वचषक 2023 मध्ये शुबमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला अवघ्या 23 धावांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी, चाहत्यांनी स्टॅन्डमधून गिलकडे पाहून जोरदार घोषणाबाजी केली. गिल आणि सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा मागच्या मोठ्या काळापासून आहेत. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांकडून लाईव्ह सामन्यात घोषणाबाजी झाली.

“हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो,” अशा घोषमा स्टॅन्ड्समधून दिल्या जात होत्या. गिलने या घोषणांकडे दुर्लक्ष केले. मात्र, विराट हे ऐकून शांत राहिला नाही. त्याने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा ईशारा केला. सोबतच गिलने पुढे पाहिल्यानंतर मजेशीर रिएक्शन देखील दिली. विराटच्या रिएक्शनवरून असेच वाटते की, गिल चाहत्यांना शांत करण्याच्या जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्च्या नुकसानावर 326 धावा केल्या. यात विराटव्यतिरिक्त श्रेयस अय्यर यानेही 77 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. भारताच्या गोलंदाजी विभागानेही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट बाद केल्याचे पाहायला मिळाले.

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.

महत्वाच्या बातम्या – 
‘मी कशाला विराटचं अभिनंदन करु?’ कोहलीबद्दल प्रश्न विचारताच भडकला ‘हा’ खेळाडू 
अखेर वर्तुळ पूर्ण झाले! विराटचा ईडनवर सुरू झालेला प्रवास ईडनवरच पूर्ण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---