दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा (sa vs ind odi series) शेवटचा सामना रविवारी खेळला गेला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने शेवटच्या षटकात भारताच्या युजवेंद्र चहलची विकेट घेतली आणि चार धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय मालिकेत भारताला मिळालेला हा सलग तिसरा पराभव आहे. दक्षिण अफ्रिकेने या मालिकेत भारतीय संघाला व्हाईटवॉश (३-०) दिला आहे. दरम्यान, तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) याच्याशी संबंधीत काही आकडे समोर आले आहेत.
एकदिवसीय मालिकेतील पराभवापूर्वी भारतीय संघाने कसोटी मालिकेत देखील दक्षिण अफ्रिकेकडून पराभव पत्करला होता. कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने २-१ असा विजय मिळवला आहे. दरम्यान या दौऱ्यात भारतीय संघाचे ज्याप्रकारची कामगिरी केली आहे, तशीच कामगिरी राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघाने २००६-०७ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यात केली होती.
राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारताचा संघ २००६-०७ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यात खेळलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला व्हाईटवॉश (४-०) मिळाला होता, तर कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघाला २-१ ने पराभूत केले होते. आता द्रविड भारताचा मुख्य प्रशिक्षक आहे. योगायोगाने दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पुन्हा जूने २००६-०७ मधील आकडे दिसत आहेत. यावर्षीच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत भारताला अफ्रिकी संघाकडून व्हाईटवॉश (३-०) मिळाला आहे. तर कसोटी मालिकेत देखील २-१ असा पराभव स्विकारावा लागला आहे. दक्षिण अफ्रिकेच्या या दोन्ही दौऱ्यात द्रविड मात्र महत्वाच्या भूमिकेत होते.
दरम्यान, यावर्षीच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाने सर्वांचीच निराशा केली. संघाकडून या दौऱ्यात चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्या भारताने विजय मिळवून आघाडी घेतली होती. मात्र, पुढच्या दोन कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला आणि कसोटी मालिका देखील नावावर केली. त्यानंतर १९ जानेवारीपासून सुरू झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला एकही विजय मिळवता आला नाही.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ प्रश्नावर मिताली राजचा सुटला संयम; पत्रकारांवर आगपाखड करत म्हणाली…
दक्षिण आफ्रिकेचा भारताला ‘व्हाईटवॉश’! दीपक चहरची झुंजार खेळी व्यर्थ
विनयच्या ‘गोल्डन’ बोनसने हरियाणाचा युपीवर एका गुणाने विजय
व्हिडिओ पाहा –