आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्सने (kkr) पुढच्या हंगामासाठी संघाचा महत्वाचा खेळाडू शुबमन गिल (shubman gill) याला रिटेन केले नाहीये. शुबमनने आयपीएलमध्ये २०१८ साली केकेआर संघाकडून पदार्पण केले होते आणि त्यानंतर मागच्या हंगामापर्यंत या एकाच संघात खेळत होता. मागच्या हंगामात त्याने केकेआरसाठी चांगले प्रदर्शन देखील केले होते. मात्र, तरीही संघाने त्याला रिटेन केले नाही. आता केकेआरचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम (brendon mccullum) गिलला रिलीज करण्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मागच्या हंगामात केकेआरला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये गिलची महत्वाची भूमिका राहिली होती. अशात त्याला रिटेन न केल्यामुळ चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पुढच्या हंगामासाठी केकेआरने सुनील नरीन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना रिटेन केले आहे. या चौघांनीही संघासाठी महत्वाचे प्रदर्शन केले होते. पुढच्या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा मेगा लिलावा आयोजित केला जाणार आहे.
गिलसारख्या फलंदाजाला सोडणे निराशाजनक होते – मॅक्युलम
मॅक्युलमने मेगा लिलाव काही दिवसांवर असता गिलविषयी त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याच्या मते गिलसारख्या फलंदाजाला गमावणे निराशाजनक गोष्ट आहे. केकेआरच्या लाईव्ह सेशनमध्ये बोलताना मॅक्युलम म्हणाला की, “तुम्हाला योजना करण्याची गरज असते. कारण, तुम्ही अशा परिस्थितित अनेक खेळाडूंना गमावता. शुबमन गिलला गमावणे निराशाजनक होते. मात्र, आयुष्य असेच असते आणि आम्हाला येणाऱ्या लिलावासाठी तयार राहिले पाहिजे.”
शुबमन गिलला केकेआरने सर्वप्रथम २०१८ मध्ये १.८ करोड रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्याने फ्रेंचायझीसाठी ५८ सामने खेळले आणि यामध्ये १२३ च्या स्ट्राइक रेटने १४१७ धावा केल्या. आयपीएलमधील त्याच्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने पुढे भारतीय संघातही पदार्पण केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला भारताच्या कसोटी संघातही संधी दिली गेली. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने कसोटी मालिकेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा तो साक्षीदार बनला. भारतासाठी त्याने आतापर्यंत एकूण १० कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये ५५८ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तीन सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘यंग इंडिया’च्या यशाचा ‘हा’ आहे सूत्रधार! कर्णधार यश धूलने केला खुलासा
देशातील सर्वात सुंदर स्टेडियमचे होणार लवकरच उद्घाटन; पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये झाला खुलासा
इयान चॅपलकडून विराट कोहलीचे कौतुक, म्हणाले – तो सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक होता
व्हिडिओ पाहा –