आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या पुनरूज्जीवनासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू केलेली. स्पर्धेची पहिली सायकल २०२१ मध्ये पूर्ण झाल्यानंतर, आता या स्पर्धेची दुसरी सायकल सुरू आहे. त्याच स्पर्धेच्या बाबतीत आयसीसीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
आयसीसीची वार्षिक बैठक २५ जुलै आणि २६ जुलै रोजी बर्मिंघम येथे आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये अनेक प्रमुख निर्णयांची औपचारिक घोषणा करण्यात आली. २०१९ मध्ये सुरू झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या सायकलच्या आणि पुढील सायकलच्या अंतिम फेरीच्या ठिकाणाचा अंतिम निर्णय या बैठकीत घेतला गेला. या दोन्हीवेळी स्पर्धेचा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर होणार असल्याचे आयसीसीने नक्की केले.
बैठकीत घेतलेल्या निर्णयामध्ये असे सांगण्यात आले की, आयसीसीने लॉर्ड्सवर २०२३ आणि २०२५ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे अंतिम सामने खेळण्यास मान्यता दिली आहे. २०२१ मध्ये सुरू झालेली कसोटी चॅम्पियनशिपची सध्याची सायकल २०२३ मध्ये संपेल. लॉर्ड्सवरील अंतिम फेरीनंतर तिसरी सायकल सुरू होईल, जी २०२५ पर्यंत चालेल. कसोटी चॅम्पियनशिपची पहिली सायकल २०१९ मध्ये सुरू झाली आणि २०२१ मध्ये संपलेली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या सायकलचा अंतिम सामना खेळला गेला होता. यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवलेला. हा अंतिम सामना साउथॅम्प्टनमध्ये खेळला गेला होता. पूर्वी हा सामना लॉर्ड्सवरच होणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भयानक लाटेमुळे स्वतःचे हॉटेल असलेल्या साउथम्प्टनला हा अंतिम सामना हलवावा लागलेला. भारत आणि न्यूझीलंडच्या संघांना कोविड संसर्गापासून वाचवण्यासाठी या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!
‘त्यावेळी मी कारगिल युद्ध लढायला निघालेलो’, शोएब अख्तरने केले बेताल विधान
बंगाल क्रिकेट संघाला मिळाले नवे प्रशिक्षक; टीम इंडियाला पोहोचवलेलं वर्ल्डकपच्या फायनलमध्ये






