यंदाचे पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) नुकतेच संपले. तत्पूर्वी आता चाहत्यांचे लक्ष्य 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर लागले असेल. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये 124 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी ऑलिम्पिकमध्ये टी20 क्रिकेटचा समावेश करण्याची घोषणा झाली, त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले होते.
1900 मध्ये पॅरिसचे पहिले ऑलिंपिक झाले तेव्हा पहिल्यांदाच क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यावेळी फक्त एक पुरुष सामना खेळला गेला होता, जो ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सच्या संघांमध्ये होता. ग्रेट ब्रिटननं हा सामना 158 धावांनी जिंकला होता. आता 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा पुन्हा एकदा समावेश होणार असून यंदा टी20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला आहे.
भारतानं अलीकडेच 2024च्या टी20 विश्नचषकावर नाव कोरले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 संपल्यानंतर, भारत लॉस एंजेलिस ऑलिंपिक 2028 पर्यंत 4 आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेत आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025, टी20 विश्वचषक 2026 आणि एकदिवसीय विश्वचषक 2027चा समावेश आहे. यामध्ये भारताला चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची घोषणा झाल्यावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “शतकाहून अधिक प्रतीक्षेनंतर आमचा लाडका खेळ ऑलिम्पिकच्या मंचावर परतला आहे. नवीन क्रिकेटपटूंसाठी ही सुवर्णसंधी आहे.” तर भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचं पुनरागमन झाल्यानं एक पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहलं की, “भारतासाठी ही चांगली बातमी आहे, कारण आमच्याकडे एक उत्कृष्ट क्रिकेट संघ आहे. लॉस एंजेलिस 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश या खेळाचा जागतिक प्रभाव वाढवण्याची एक उत्तम संधी आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
PAKvsBAN: पाकिस्तानात समोस्यांपेक्षा स्वस्त दरात मिळतायत कसोटीची तिकिटे, सोशल मीडियावर होतंय हसू!
विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार? आज रात्री इतक्या वाजता येईल निर्णय
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूला झाली मोठी दुखापत