---Advertisement---

‘अनेकांनी घरी पाठवण्याची तयारी केलेली, म्हणूनच…’ टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या कार्तिकची प्रतिक्रिया

On: मंगळवार, मे 24, 2022 4:24 PM
Dinesh karthik
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तब्बल तीन वर्षांनंतर दिनेश कार्तिक भारतीय जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या कार्तिकचा विश्वास आहे की, त्याच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात खास पुनरागमन आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वेबसाइटशी बोलताना 36 वर्षीय कार्तिक म्हणाला की, ‘हे माझे सर्वात खास पुनरागमन आहे, कारण अनेकांनी मला घरी पाठवण्याची तयारी केली होती.  माझ्यासाठी, परत येण्याचा अर्थ असा आहे की मी त्याच पद्धतीने खेळेन, त्याच पद्धतीने सराव करेन आणि त्याच पद्धतीने काम करेन आणि भारताला विजय मिळवून देण्यास प्रयत्न करेल, असा विश्वास कार्तिकने व्यक्त केला आहे.’

दिनेश कार्तिकने 2019 च्या विश्वचषकात भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाचे कौतुक करताना कार्तिक म्हणाला की ‘त्यांनी माझी भूमिका स्पष्टपणे सांगितली आणि मला पाठिंबा दिला. मी आरसीबीचा ऋणी राहीन, ज्यांनी माझी निवड केली आणि माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही जबाबदारी दिली.’

निवडीचे दावेदार अनेक तरुण खेळाडू असतील ज्यांचे कौशल्य सर्वांसमोर आहे. ‘आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या दावेदारांमध्ये असणे ही त्यांच्यामध्ये एक अद्भुत भावना आहे, मला माहित आहे ध्येय अजून दूर आहे, परंतु रणनीतीचा भाग असणे आणि स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळणे ही देखील मोठी गोष्ट आहे’, असे म्हणत कार्तिकने भारतासाठी आगामी टी२० विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

नया है यह! वेगवान गोलंदाजाने टाकलेला चेंडू झाला स्पिन, फलंदाजाच्याही उडाल्या दांड्या

पाकिस्तानच्या बाबर आझमवर आयपीएलमध्ये ‘या’ टीमने लावले असते कोट्यवधी, अख्तरचा दावा

GTvsRR। बटलर ते मिलर, ‘या’ ५ खेळाडूंवर असणार सर्वांच्या नजरा, गाजवू शकतात पहिला क्वालिफायर सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---