टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) भारतासाठी संमिश्र सुरुवात झाली आहे. तिरंदाजीत दीपिकाने उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे नेमबाजीत मनु भाकर आणि राही सरनोबतला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत अविनाश कांबळेने राष्ट्रीय विक्रम मोडत सातवा क्रमांक पटकावला, पण त्याला अंतिम स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अशातच आता बॉक्सिंगमधून आनंदाची बातमी येत आहे.
महिला बॉक्सिंगमध्ये ६९ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारताची लवलीना बोरगोहेन आणि चीनी ताईपेच्या चेन निएन-चिनमध्ये झाला. या सामन्यात लवलीनाने माजी विश्वविजेती चेनला ४-१ ने पराभूत केले. तसेच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यासह भारताच्या नावावर टोकियो ऑलिंपिकमध्ये आणखी एका पदकाची नोंद होणे निश्चित झाले आहे. (Lovlina Borgohain Beat Chen Nien-chin 4-1 In Women Welterweight 69 KG)
यादरम्यान पहिल्या राऊंडमध्ये लवलीनाने विजय मिळवला आहे. परीक्षकांनी ३-२ असा निर्णय दिला. दुसऱ्या राऊंडमध्येही लवलीनाने अफलातून कामगिरी करत तिला सर्व परीक्षकांनी १० गुण दिले. तिसऱ्या राऊंडमध्येही विजय मिळवत सामना खिशात घातला आहे.
CREATES HISTORY ????@LovlinaBorgohai puts up a brilliant performance and secures 1st medal for ???????? from boxing in 69 kg at @Tokyo2020 She beat Chinese Taipei's Chen NC 4-1 in QF to reach semis ????#RingKeBaazigar#boxing#Tokyo2020#Cheer4India#TeamIndia pic.twitter.com/28cpzoUxZY
— Boxing Federation (@BFI_official) July 30, 2021
महिला बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटात चेन ही जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिला टोकियो ऑलिंपिकमध्ये चौथा क्रमांक देण्यात आला आहे, तर लवलीना पाचव्या स्थानी आहे.
कोण आहे लवलीना बोरगोहेन?
लवलीना ही केवळ २४ वर्षांची आहे. आसामच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या लवलीनाने ऑलिंपिकपर्यंतचा प्रवास केला आहे. ती आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील सरुपथर विधानसभेच्या बरोमुखिया या छोटाशा गावातील राहणारी आहे. यापूर्वी तिने २ वेळा विश्व चँपियनशीपमध्ये पदक जिंकले आहे. असा पराक्रम करणारी ती आसामची पहिली बॉक्सर आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-






