---Advertisement---

अवघ्या 7 धावांत संपूर्ण संघ ऑलआऊट! टी20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या

On: सोमवार, नोव्हेंबर 25, 2024 11:51 AM
---Advertisement---

टी20 क्रिकेट हा असा फॉरमॅट आहे, ज्यात कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. असंच काहीसं टी20 विश्वचषक आफ्रिका क्वालीफायर्स सामन्यात घडलं.

नायजेरिया आणि आयव्हरी कोस्ट यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात टी20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या नोंदल्या गेली. या सामन्यात आयव्हरी कोस्टचा संघ 7.3 षटकांत अवघ्या 7 धावांत गडगडला. आयव्हरी कोस्टची फलंदाजी इतकी खराब होती, की संघाचे सहा फलंदाज खातं न उघडताच बाद झाले.

सात धावांत ऑलआऊट होऊन आयव्हरी कोस्टनं आंतरराष्ट्रीय टी20 मधील सर्वात कमी धावसंख्येचा नकोसा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम मंगोलिया आणि आयल ऑफ मॅनच्या नावावर होता. हे दोन्ही संघ 10 धावांत ऑलआऊट झाले होते. विशेष म्हणजे मंगोलियानं याच वर्षी सिंगापूरविरुद्ध हा नकोसा विक्रम केला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या नायजेरियानं शानदार फलंदाजी करत 271/4 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. सलामीवीर सुलेमान रनसेवे आणि सेलिम सलाऊ यांनी पहिल्या विकेटसाठी 10 षटकांत 128 धावा जोडल्या. सुलेमान 29 चेंडूत 50 धावा करून धावबाद झाला. सलाऊनं 53 चेंडूत 112 धावा केल्या आणि नंतर रिटायर्ड हर्ट झाला. अखेरीस आयझॅक ओकपेनं 23 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या. त्याच्या खेळीत तीन चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. आयव्हरी कोस्टच्या दोन गोलंदाजांनी चार षटकांत 63-63 धावा दिल्या.

272 या धावसंख्येचा पाठलाग करताना आयव्हरी कोस्टच्या विकेट पडण्याची प्रक्रिया पहिल्या षटकातच सुरू झाली. संघाचे चार फलंदाज क्लीन बोल्ड तर दोन एलबीडब्ल्यू आऊट झाले. एक फलंदाज धावबाद झाला. नायजेरियासाठी एका गोलंदाजानं दोन षटकं टाकली आणि दोन्ही मेडन्स टाकत दोन बळी घेतले. दुसऱ्या गोलंदाजाने 1.3 षटकात एकही धाव न देता तीन बळी घेतले.

हेही वाचा – 

अब्दुल समदपासून नेहाल वढेरापर्यंत, मेगा लिलावात या अनकॅप्ड खेळाडूंना मिळाले कोट्यावधी रुपये!
IPL Auction 2025 Day 2: या खेळाडूंंवरही लागणार कोट्यावधी रुपयांची बोली, रिषभ पंतचा विक्रम मोडू शकतो
मुंबई इंडियन्सने हिऱ्यासारखा खेळाडू गमावला! यामुळे सुवर्णसंधी वाया गेली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---