पुणे, दि. 25 जानेवारी 2024 – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत साखळी फेरीत लॉयला स्कुल, कल्याणी स्कुल, विद्या व्हॅली , सेंट व्हिन्सेंट स्कुल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत फुटबॉल लीग स्पर्धेत कल्याणी स्कूल संघाने श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संघाचा 2-0 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून सामन्या दीक्षित(2 मि.), रुहान(15 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सोहम दळवी(3,6,12 मि.)याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर आर्यन वर्ल्ड स्कूल संघाने दस्तूर संघाचा 8-0 असा सहज पराभव केला. फादर एग्नेल संघाने ह्यूम मॅकेनरी संघाचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. फादर एग्नेल संघाकडून कताद शेख(5, 14 मि.) याने दोन गोल केले.
हॉकी लीगमध्ये लॉयला स्कुल संघाने सेंट व्हिन्सेंट ‘ब संघाचा 9-0 असा धुव्वा उडवला. लॉयला स्कुलकडून स्कायलर राज(2,3,10,11,19,20,23 मि.)याने सात गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात लॉयला स्कुल संघाने 1-0 असा पराभव केला. बास्केटबॉल लीगमध्ये जेएन पेटिट संघाने सेंट पॅट्रिक्सचा 12-0 असा पराभव करून आगेकूच केली.
निकाल: साखळी फेरी: फुटबॉल लीग:
कल्याणी स्कूल: 2 (सामन्या दीक्षित 2 मि., रुहान 15 मि.)वि.वि.श्री श्री रविशंकर विद्या मंदिर: 0;
आर्यन वर्ल्ड स्कूल: 8 (सोहम दळवी 3,6,12 मि., भावेश धेडे 7,14 मि., कुहसल बागले 2,15 मि., रुद्र पासलकर 19 मि.)वि.वि.दस्तूर: 0;
फादर एग्नेल: 2 (कताद शेख 5, 14 मि.)वि.वि.ह्यूम मॅकेनरी: 0;
सेंट व्हिन्सेंट्स: 5 (अर्जलान लांडगे 3, 18 मि., अनुष लोढा 2, 10 मि., जोएल चेरियन 16 मि.) वि.वि. श्री श्री रविशंकर विद्या मंदिर
विद्या व्हॅली: 3 (शौर्य मेहता 8.16 मि., आरव देशमुख 17 मि.) वि.वि.दस्तुर बॉईज: 0;
हॉकी लीग:
सेंट व्हिन्सेंट ‘अ’: 2 (झोहान शेख 14 मि., सार्थ सेठिया 16 मि.)वि.वि.एमसीईएस आझम कॅम्पस: 1 (अयान शेख 9 मि.);
लॉयला स्कुल: 9 (स्कायलर राज 2,3,10,11,19,20,23 मि. इशान 12 मि., साईराज 16 मि.)वि.वि.सेंट व्हिन्सेंट ‘ब: 0;
लॉयला स्कुल: 1 (राजवीर 12 मि)वि.वि.सेंट व्हिन्सेंट ‘अ’: 0;
बास्केटबॉल लीग:
सेंट व्हिन्सेंट ‘अ’: 19 (निषाद 6, कोविद 6, शौर्यवीर 2, श्लोक 2, वरद 3) वि.वि.लॉयला स्कुल: 10(राम 4, यश 6);
विद्यांचल स्कुल: 14 (काहिरे समर्थ 10, देव रॉय 2, स्वरित 2)वि.वि.जेएन पेटिट: 11 (मोक्ष 6, सोहम 4, मिहिर 1);
जेएन पेटिट: 12 (सोहम 8, मोक्ष 4)वि.वि.सेंट पॅट्रिक्स: 0;
महत्वाच्या बातम्या –
ICC Men’s Cricketer of the Year । विश्वविजेत्या कमिन्सपुढे सर्व फेल, सर्वात मोठा मान मिळत केला वर्षाचा शेवट
नुसती यादी पाहून डोळे फिरतील! आयसीसीचे 10 ॲवॉर्ड्स मिळवणारा विराट जगात एकमेव