आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागच्या वर्षी अनेक घटामोडी झाल्या. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने वनडे विश्वचषक 2023 आणि त्याआधी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले. या दोन्ही स्पर्धांमध्ये पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. कमिन्ससाठी एकंदरीतच मागचे वर्ष आठवणीत राहण्यासारखे ठरले. गुरुवारी (25 जानेवारी) कमिन्स आयसीसी सर गारफिल्ड सोबर्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी ठरली.
कमिन्स 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार बनला. त्याने संघाचे नेतृत्व हातात घेतल्यानंतर संघ पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 2023 वर्षाची सुरुवात तशी ऑस्ट्रेलियासाठी अपेक्षित झाली नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण तरीही कमिन्सने आपल्या नेतृत्वात संघाला पुढच्या मालिकांमध्ये यश मिळवून दिले. भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. आशेस 2023 मध्ये कमिन्सच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने मालिका बरोबरीत सोडवली. त्याचसोबत वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात देखील त्याने भारताविरुद्ध संघाला विजय मिळवून दिली.
View this post on Instagram
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली, ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रेविस हेड आणि भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजा यांना मागे टाकत कमिन्सने हा पुरस्कार नावावर केला. (The Australia bowler and captain has claimed the Sir Garfield Sobers Trophy for ICC Men’s Cricketer of the Year)
तत्पूर्वी आयसीसीकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून सूर्यकुमार यादव याची निवड केली गेली होती. बुधवारी (24 जानेवारी) हा पुरस्कार सूर्यकुमारला दिला गेला. त्याचसोबत न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रविंद्र याला आयसीसी एमर्जिंक प्लेअर ऑफ इयर पुरस्कार दिला गेला. गुरुवारी आयसीसीने कसोटी आणि वनडे फॉरमॅटमधील क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार घोषित केले. कसोटी फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याला मिळाला. तर वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली याने पुन्हा एकदा बाजी मारली. विराट चार वेळा आयसीसी वनडे क्रिकेटर फॉफ द इयर बनणारा पहिलाच खेळाडू आहे.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । हैदराबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर, अश्विन-जडेजानंतर जयस्वालचा धमाका
उस्मान ख्वाजाने जिंकला 2023 ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार, ‘हा’ भारतीयही होता शर्यतीत






