सोमवारी (10 एप्रिल) आयपीएल 2023 मध्ये चाहत्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील थरारक सामना पाहायला मिळाला. आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियम या घरच्या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना 212 अशी भलीमोठी धावसंख्या उभी केली. मात्र, याचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांनी तुफानी खेळी करत विजयी लक्ष्य गाठले. अखेरच्या चेंडूवर लखनऊ संघाने हा सामना एका विकेटने आपल्या नावे केला. मात्र, त्याचवेळी विजयाचे सेलिब्रेशन करताना लखनऊचा खेळाडू आवेश खान याने अतिआक्रमकपणा दाखवला.
मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात लखनऊने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. शेवटच्या षटकात केवळ पाच धावांची आवश्यकता असतानाही हर्षल पटेलने दोन बळी मिळवत सामना रंगतदार केला होता. लखनऊ संघाला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती. पटेलने सुरुवातीला रवी बिश्नोई याला मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर स्ट्राइकला असलेल्या आवेश खान याला चेंडूचा बॅटशी संपर्क करता आला नाही. मात्र, यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडून चूक झाल्याने आवेश व रवी यांनी एक धाव पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला.
Somebody 🤏 us because WE STILL CANNOT BELIEVE IT 😍#RCBvLSG | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndazpic.twitter.com/NC6dJRVZVt
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2023
विजयी धाव घेतल्यानंतर आवेश खान याने आपले हेल्मेट काढून जोरात जमिनीवर आपटले. त्याच्या या आक्रमकपणामुळे त्याने आयपीएलच्या 2.2 नियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आहे. मात्र, यानंतरही त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. संघाकडून घडलेली ही पहिली चूक असल्याने त्याला केवळ समन्स बजावण्यात आला. तसेच त्याने आपली चूक मान्य केल्याने त्याला ताकीद दिली गेली.
दुसरीकडे आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याला षटकांची गती राखताना आल्याने दंडीत करण्यात आले. त्याला दंड स्वरूपी 12 लाख रुपये रक्कम जमा करावी लागली.
(LSG Pacer Avesh Khan Throw Helmet After Win Over RCB Breach IPL Code Of Conduct)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीची स्टाईल मारायला निघालेला कार्तिक, पण शेवटच्या चेंडूवर बिघडवला सगळा गेम
क्रिजच्या बाहेर असूनही बिश्नोनी नाबाद! आरसीबीच्या पराभवात हर्षल पटेलची ‘ही’ चूकही कारणीभूत