इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत दोन संघ वगळता, इतर 8 संघांनी प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. आतापर्यंत स्पर्धेत 24 सामने खेळले गेले आहेत. या हंगामात एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत. यात प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. यातील प्रत्येकी 7 सामने घरच्या मैदानावर, तर उर्वरित 7 सामने इतर ठिकाणी खेळले जाणार आहेत. अशातच मोठी बातमी समोर येत आहे. ती अशी की, लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात गुरुवारी (दि. 4 मे) खेळला जाणारा सामना 3 मे रोजी खेळला जाणार आहे.
महापालिका निवडणुकीमुळे वेळापत्रकात बदल
खरं तर, शहरात महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या एक दिवस आधीच लखनऊ विरुद्ध चेन्नई (Lucknow vs Chennai) संघातील सामना आयोजित केला जात आहे. सामन्याविषयी अधिकृत माहितीदेखील जाहीर करण्यात आली आहे. बीसीसीआयने संघांना सांगितले आहे की, सामना एक दिवस आधीच आयोजित केला जाणार आहे. याची माहिती लखनऊ संघानेही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
Attention, #LSGBrigade! Our home game against CSK, originally scheduled on May 4, has been moved to May 3 🗓#LSGvCSK | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/tgD0gELtPj
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 17, 2023
सुरक्षा तैनात करण्यात होऊ शकते समस्या
यापूर्वी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले होते की, “सीएसकेविरुद्ध एलएसजीचा सामना दुपारी 3.30 वाजता आहे. आता हा सामना एक दिवस आधी बुधवारी (दि. 3 मे) रोजी खेळला जाऊ शकतो. लखनऊ महापालिका निवडणुका गुरुवारी (दि. 4 मे) मतदान होणार असल्यामुळे सुरक्षा तैनात करण्यात समस्या होऊ शकते.” विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये शनिवारी-रविवारी डबल-हेडर सामने खेळवले जातात. मात्र, आता पुढील महिन्यात 3 मे रोजी डबल-हेडर सामना खेळला जाणार आहे. पहिला सामना लखनऊ विरुद्ध चेन्नई संघात, तर दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे.
लखनऊ दुसऱ्या स्थानी कायम
गुणतालिकेबाबत बोलायचं झालं, तर लखनऊ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यातील 3 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे, तर उर्वरित 2 सामन्यात त्यांनी पराभव पत्करला आहे. लखनऊ 6 गुणांसह दुसऱ्या कायम आहे, तर अव्वलस्थानी राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थानने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तसेच, 8 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच, चेन्नई संघ 5 पैकी 3 विजय आणि 2 पराभवांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे. (lsg vs csk match to be played on may 3 instead of may 4 due to municipal polls ipl 2023 know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या ‘इम्पॅक्ट’ जाळ्यात फसला ‘किंग’ कोहली, पाहून पत्नी अनुष्काही शॉक; व्हिडिओ व्हायरल
फाफ अन् मॅक्सवेलचा भीमपराक्रम! विराट-राहुलला पछाडत आरसीबीसाठी रचला भागीदारीचा नवीन रेकॉर्ड