दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर 8 विकेट्सने पराभव केला. एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, लखनऊ संघाने प्रथम खेळताना 159 धावा केल्या, प्रत्युत्तरात, दिल्ली संघाने 18 व्या षटकात 8 विकेट्स शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्सचा हा 8 सामन्यांतील सहावा विजय आहे.
मुकेश कुमारने दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा पाया रचला. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 33 धावा देऊन 4 बळी घेतले. त्याने मिचेल मार्श, अब्दुल समद, आयुष बदोनी आणि एलएसजीचा कर्णधार रिषभ पंत यांचे बळी घेतले. त्याच्याशिवाय, दिल्लीकडून दुष्मंत चामीरा आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी एक बळी घेतला. गेल्या सामन्यात दिल्लीचा गुजरातकडून पराभव झाला होता, परंतु आता एलएसजीचा पराभव करून, पुन्हा एकदा विजयी गती प्राप्त झाली आहे.
That one had fire written all over it ????
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2025
???? Mukesh Kumar ends Mitchell Marsh's charge with an unplayable yorker ????
Updates ▶️ https://t.co/nqIO9maALU#TATAIPL | #LSGvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/LT5ufqjZYC
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला जलद सुरुवात मिळाली परंतु करुण नायर 15 धावा करून बाद झाला. यानंतर, केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी मिळून एलएसजीच्या गोलंदाजांना चिरडून 69 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. राहुलचा थांबण्याचा कोणताही विचारच नव्हता, त्याने कर्णधार अक्षर पटेलसोबत ५६ धावांची भागीदारी करून आपल्या संघाचा विजय निश्चित केला.






