---Advertisement---

LSG vs DC: ‘हा’ ठरला दिल्लीच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या वेगवान माऱ्याने लखनऊ सुपर जायंट्सच्या डावाला खीळ घातली. आयपीएल 2025 मधील 22 एप्रिलच्या 40व्या सामन्यात, स्टार्कने वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनला केवळ 9 धावांवर तंबूत पाठवत दिल्लीला मोठं यश मिळवून दिलं. हाच तो विकेट होता ज्याने सामना दिल्लीच्या पारड्यात झुकला.

सामन्याच्या 12व्या षटकात हा निर्णायक क्षण घडला. क्षेत्ररचनेनुसार शॉर्ट बॉल येणार असं वाटत असतानाच, स्टार्कने वेग कमी करत पूरनला चकवलं. चुकीचा अंदाज घेतलेला पूरन चेंडू स्टम्पवर खेळून बाद झाला.

ही विकेट मिळताच मिचेल स्टार्कने टी-20 क्रिकेटमध्ये पूरनला पाचव्यांदा बाद करत आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं. या यादीत आता तो आंद्रे रसेल, ओबेड मॅकॉय, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूरसारख्या दिग्गजांसोबत आहे.

सामन्याच्या सुरुवातीला मिचेल मार्श आणि एडन मार्कराम यांच्या जोडीने 87 धावांची भागीदारी करत लखनऊला मजबूत सुरूवात करून दिली होती. पण 10व्या षटकात मार्कराम बाद झाल्यावर परिस्थिती बदलली. 89/1 वर असलेली लखनऊची स्थिती काही क्षणांतच 110/4 झाली. पूरनचा अपयश त्यात भर घालणारा ठरला. मिचेल स्टार्कच्या या शानदार कामगिरीमुळे सामना दिल्लीच्या बाजूने वळला आणि लखनऊला मोठा धक्का बसला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---