आयपीएल 2025 मधील 26 वा सामना आज (12 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. लखनऊ सुपर जायंट्सने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. 181 धावांचा पाठलाग करताना निकोलस पूरन आणि एडेन मार्कराम यांनी आपले कौशल्य दाखवून संघाला विजयाकडे नेले. दोघांनीही दमदार अर्धशतके ठोकली. सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला असला तरी, यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा दबदबा पाहायला मिळाला.
या सामन्यात लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा निर्णय फारसा फलदायी ठरला नाही. गुजरातच्या सलामीवीरांनी जोरदार सुरुवात केली. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शांत पण प्रभावी फलंदाजी करत संघाचा डाव भक्कम केला. त्यांनी अर्धशतके ठोकत 100+ धावांची भागीदारी उभी केली, आणि त्यांची जोडी अखेर 13व्या षटकात 120 धावांवर फुटली.
𝘽𝙧𝙞𝙡𝙡𝙞𝙖𝙣𝙩 𝘽𝙞𝙨𝙝𝙣𝙤𝙞 😎
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
An over with double delight that has put #LSG back into the match ✌️
Updates ▶ https://t.co/VILHBLEerV #TATAIPL | #LSGvGT | @bishnoi0056 pic.twitter.com/4ylELVJpqm
🔝 Catch
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
🔝 Celebration
🔝 Wicket
🎥 Shardul Thakur's brilliant grab that brought out Digvesh Rathi's trademark celebration ™️
Updates ▶ https://t.co/VILHBLEerV #TATAIPL | #LSGvGT | @LucknowIPL pic.twitter.com/wlTRAw3ASV
संघाची घौडदौड सुरू असतानाही, डेथ ओव्हर्समध्ये लय गमावल्यामुळे गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलग विकेट्स गेल्याने गती खुंटली आणि गुजरातने 20 षटकांत 6 बाद 180 धावा केल्या.
पण ही धावसंख्या पुरेशी ठरली नाही. लखनऊने यशस्वीरित्या लक्ष्याचा पाठलाग केला. शेवटच्या षटकात सामना रंगतदार झाला, पण लखनऊने 19.3 षटकांतच 180 धावांचा टप्पा गाठत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
रवी बिश्नोई आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शिवाय, निकोलस पूरन (61) आणि एडेन मार्कराम (58) यांच्या स्फोटक अर्धशतकांमुळे लखनऊ हा सामना 6 विकेट्सने जिंकला.