---Advertisement---

‘बहुत तगडा करा’, दुभाषक म्हणून किल्ला लढवताना रिषभची वाक्य; पहा व्हिडीओ

---Advertisement---

IPL 2025: आयपीएलच्या या हंगामातील 16व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्स संघाचा 12 धावांनी पराभव केला. अटीतटीच्या या सामन्यात शेवटी लखनऊने बाजी मारली. या सामन्यात दिग्वेश राठीने मोलाची कामगिरीने केली. 204 धावांचा बचाव करताना, त्याने 4 षटकात केवळ 21 धावा दिल्या शिवाय एक विकेटही घेतली. त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला.

सामन्यानंतरचा एक दिलखेचक क्षण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि युवा गोलंदाज दिग्वेश राठी यांच्यातला संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. प्लेयर ऑफ द मॅच म्हणून राठीला जेव्हा पुरस्कारासाठी बोलावण्यात आलं, तेव्हा पंत त्याच्यासाठी दुभाष्याची भूमिका बजावताना दिसला.

पाहा व्हिडिओ-

पुरस्कार समारंभादरम्यान इंग्रजीत विचारले गेलेले प्रश्न राठीला पूर्णपणे समजतील यासाठी रिषभ पंतने ते हिंदीत अनुवादित करून सांगितले. त्यानंतर राठीने आत्मविश्वासाने उत्तरं दिली. संपूर्ण प्रसंगात दोघांमध्ये असलेली सहजता आणि मैत्रीपूर्ण केमिस्ट्री लक्षवेधी ठरली.

हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाला असून, अनेकांनी पंतच्या दिलखुलास स्वभावाचं कौतुक केलं आहे. “पंत नेहमीच टीममधल्या खेळाडूंच्या पाठीशी असतो. हे दृश्य त्याचं उत्तम उदाहरण आहे,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---