मंगळवारी (दि. 16 मे) लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 63वा सामना लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत लखनऊला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान मुंबईने चार वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटूंना संधी दिली. तसेच, लखनऊने काईल मेयर्सच्या जागी नवीन उल हक आणि आवेश खानच्या जागी दीपक हुड्डा, तसेच अमित मिश्राच्या जागी स्वप्निल सिंग याला संधी दिली. मात्र, लखनऊला फलंदाजी करताना मोठा धक्का बसला. संघाचा कर्णधार कृणाल पंड्या रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.
कृणाल पंड्या रिटायर्ड हर्ट
प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाचा कर्णधार कृणाल पंड्या (Krunal Pandya) याच्याकडे 16व्या षटकात आपले अर्धशतक करण्याची चांगली संधी होती. यादरम्यान पंड्याला चालण्यात अडचण झाली आणि त्यानंतर त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. कृणाल पंड्या रिटायर्ड हर्ट (Krunal Pandya Retired Hurt) होऊन मैदानातून बाहेर गेला. यावेळी त्याला आपले अर्धशतक करण्यासाठी फक्त 1 धाव हवी होती. मात्र, त्याने अर्धशतकाचा त्याग केला.
कृणाल पंड्या याने 42 चेंडूंचा सामना करताना 49 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 चौकार आणि 1 षटकारही मारला. ही त्याची आयपीएल 2017नंतरची सर्वोच्च वैयक्तिक खेळी होती. त्याने आयपीएल 2017 हंगामाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळताना 47 धावांची मोठी खेळी केली होती. पंड्या मैदानाबाहेर जाताच त्याच्या जागी निकोलस पूरन याने मैदानात एन्ट्री केली.
5️⃣0️⃣ partnership up 🙌@krunalpandya24 🤝 @MStoinis @LucknowIPL move to 86/3 after 12 overs 👊🏻
Follow the match ▶️ https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/JJvyBRFx3J
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
लखनऊ संघाचा डाव
प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 177 धावा केल्या. एकेवेळी लखनऊ संघ 6.1 षटकात 3 विकेट्स गमावत 35 धावसंख्येवर होता. मात्र, तिथून पुढे मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पंड्या यांच्यात 82 धावांची भागीदारी झाली. पंड्या रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर निकोलस पूरन याच्या मदतीने स्टॉयनिसने 60 धावांची भागीदारी रचली. यावेळी स्टॉयनिसने लखनऊसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 47 चेंडूत नाबाद 89 धावा केल्या. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 8 षटकारांची बरसात केली. इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना जेसन बेहरेनडॉर्फ याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच, पीयुष चावला यानेही 1 विकेट आपल्या नावावर घेत हंगामातील 20 विकेट्स पूर्ण केल्या. (lsg vs mi why did captain krunal pandya walk out on the score of 49 know the matter)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीटरसनने धोनीला खोटं ठरवलंच, माजी भारतीय कर्णधाराच्या पहिल्या कसोटी विकेटविषयी मोठे भाष्य
तब्बल 10 वर्षांनंतर मुंबईसाठी पीयुष चावलाला जमली ‘अशी’ कामगिरी, आधी भज्जीने केलेला पराक्रम; वाचाच