इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या प्ले-ऑफ शर्यतीत कायम राहण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ 63व्या सामन्यात आमने-सामने आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लखनऊ संघ फलंदाजी करताना मुंबईचा 34 वर्षीय दिग्गज फिरकीपटू पीयुष चावला याने एकच विकेट घेत नाद पराक्रम गाजवला. त्याने यासह हरभजन सिंग याच्या विक्रमाची बरोबरी केली.
पीयुष चावलाचा विक्रम
झाले असे की, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून डावातील सातवे षटक टाकण्यासाठी पीयुष चावला (Piyush Chawla) आला होता. यावेळी चावलाने षटकातील पहिलाच चेंडू क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याला टाकला. यावेळी डी कॉकच्या बॅटची कड घेत चेंडू थेट यष्टीरक्षण करत असलेल्या ईशान किशन (Ishan Kishan) याच्या हातात गेला. त्यामुळे यावेळी फलंदाजाला तंबूचा रस्ता धरावा लागला. डी कॉक बाद झाला, तेव्हा तो 16 धावांवर खेळत होता. या खेळीत त्याने 2 षटकारही मारले होते.
डी कॉकची विकेट घेताच चावलाच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. तो आयपीएलच्या एका हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकीपटू ठरला. चावलाने आयपीएल 2023 हंगामात आतापर्यंत 20 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईसाठी तो सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल, तर हंगामातील चौथा गोलंदाज बनला आहे.
हरभजन सिंगच्या विक्रमाची बरोबरी
या विक्रमात त्याने मुंबईचा माजी खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्या विक्रमाची बरोबरी केली. चावलापूर्वी आयपीएल 2013 हंगामात हरभजनने सर्वाधिक 20 विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएलच्या एका हंगामात 20 विकेट्स घेणारे मुंबईचे फिरकीपटू
आयपीएल 2013- हरभजन सिंग
आयपीएल 2023- पीयुष चावला*
चावलाची आयपीएल कारकीर्द
चावलाच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 178 सामने खेळताना 177 डावात 7.87च्या इकॉनॉमी रेटने 177 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 17 धावा खर्च करत 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. (Mumbai Indians Spinners Picking 20 wickets in an IPL Season know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
समुद्रामध्ये जहाज बनली क्रिकेटचं मैदान, चौकार-षटकार मारूनही हरवला नाही चेंडू, जाणून घेण्यासाठी पाहा Video
IPL 2023च्या 63व्या सामन्यात मुंबईने जिंकला टॉस, कृणालसेना करणार बॅटिंग