---Advertisement---

विराटने खरंच नवीनला दाखवला बूट? व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा

On: बुधवार, मे 3, 2023 1:51 PM
Virat-Kohli
---Advertisement---

सोमवार (दि. 1 मे) हा दिवस कदाचित कोणत्याही भारतीय क्रिकेटप्रेमीला लक्षात ठेवावा वाटणार नाही. कारण, या दिवशी आयपीएल 2023चा 43वा सामना पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाच्या बातम्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अशात, विराटने सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा फलंदाज नवीन उल हक याला मारण्यासाठी बूट काढला होता. विराटवर वेगवेगळे आरोप करण्यात आल्याचे बोलले जात आहे. एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यात विराट बूटांना हात लावताना दिसत आहे. नेमका हा वाद काय आहे, चला जाणून घेऊयात…

खरं तर, हे संपूर्ण प्रकरण लखनऊच्या डावातील 17व्या षटकात सुरू झाले. मैदानावर नवीन उल हक (Naveen ul Haq) याच्यासोबत अमित मिश्रा फलंदाजी करत होता. यादरम्यान अमित आणि नवीन यांनी काही शानदार फटके मारले. तसं पाहिलं, तर बेंगलोर हा संघ सामन्यात मजबूत स्थितीत होता. मात्र, आव्हान छोटे असूनही असे तर्क लावले जात होते की, हे फलंदाज बेंगलोरच्या हातून विजय हिसकावून घेतील. अशात विराटने दोघांना स्लेज करण्यास सुरुवात केली. यादरम्यान विराटने बूटाला हात लावण्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.

https://twitter.com/DrRSheth11/status/1653438219592273920?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1653459998616453121%7Ctwgr%5E864b9af649d024d0c3f678f27b497a4ba4d9938f%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-lsg-vs-rcb-reality-of-virat-kohli-showing-shoes-to-naveen-ul-haq-viral-video-suggest-rcb-ex-skipper-was-with-umpire-at-that-time-6076465.html

सामन्याशी निगडीत एक व्हिडिओ वेगवेगळ्या युजर्सनी शेअर केला आहे. यावरून समजू शकते की, विराटने नवीनला मारण्यासाठी बूट काढला नव्हता. तो त्याच्या बूटाला लागलेली माती दाखवत होता. हे सर्व विराट आणि नवीनमध्ये झालेल्या वादानंतर घडले. त्यामुळे हे नवीनला बूट मारण्याशी जोडले जात आहे.

https://twitter.com/alreadyventing/status/1653454780746825745?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1653454780746825745%7Ctwgr%5E864b9af649d024d0c3f678f27b497a4ba4d9938f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-lsg-vs-rcb-reality-of-virat-kohli-showing-shoes-to-naveen-ul-haq-viral-video-suggest-rcb-ex-skipper-was-with-umpire-at-that-time-6076465.html

नवीनचा असा आरोप होता की, विराट खेळपट्टीला बूटाने खराब करत आहे. विराट आणि नवीनमध्ये झालेल्या वादामध्ये अमित मिश्रा आणि पंचांनी दोघांनाही शांत कले. त्यानंतर पंच विराटसोबत गेले. यादरम्यान विराट पंचांना आपल्या बूटाखाली लागलेली माती दाखवू लागला. एकाने व्हिडिओ पाहून स्वत:ची अशी समजूत काढली की, विराट थेट नवीनला बूट दाखवत आहे. मात्र, हे स्पष्ट झाले नाही की, विराट तो बूट नवीनला मारण्यासाठी दाखवत आहे किंवा बूटावर लागलेली माती दाखवत आहे. आता या प्रकरणावर आजी-माजी क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (lsg vs rcb reality of virat kohli showing shoes to naveen ul haq video goes to viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्हीही बाचाबाची करायचो, पण हे असलं…’, गंभीर-विराट प्रकरणावर गावसकरांची कडक शिक्षेची मागणी
राहुलने वाढवलं BCCIचं टेन्शन! दुखापतीवर आली मोठी अपडेट, कृणाल पंड्या करणार लखनऊचे नेतृत्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---