बुधवारी (१८ मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात आयपीएल २०२२चा ६६ वा सामना खेळला गेला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना उभय संघांसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात लखनऊने २ धावांनी बाजी मारली. यासह लखनऊ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे, तर कोलाकाता संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने निर्धारित २० षटकात एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाला २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर २०८ धावाच करता आल्या आणि त्यांनी विजयाच्या अगदी नजीक पोहोचूनही सामना गमावला.
WHAT. A. GAME !!@LucknowIPL clinch a thriller by 2 runs.
Scorecard – https://t.co/NbhFO1ozC7 #KKRvLSG #TATAIPL pic.twitter.com/7AkXzwfeYk
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
लखनऊच्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यर याने सर्वाधिक धावा फटकावल्या. त्याने २९ चेंडू खेळताना अर्धशतक झळकावले. आपल्या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ४ चौकारही मारले. त्याच्याबरोबरच नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनीही अनुक्रमे ४२ व ४० धावांची चिवट झुंज दिली. सुनिल नारायणनेही शेवटच्या षटकात ७ चेंडूंमध्ये नाबाद २१ धावा फटकावल्या. तरीही त्यांना विजयाची चव चाखता आली नाही.
या डावात लखनऊकडून मार्कस स्टॉयनिस याने मॅच विनिंग गोलंदाजी केली. त्याने शेवटची २ महत्त्वपूर्ण षटके टाकताना किफायतशीर गोलंदाजी केली. २ षटकांमध्ये २३ धावा देत त्याने अतिशय महत्त्वाच्या ३ विकेट्स काढल्या आणि संघाला शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून दिला. स्टॉयनिसव्यतिरिक्त मोहसिन खान यानेही अतिशय शानदार गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या.
Innings Break!
What a show #LSG openers put up with the bat. Post a formidable total of 210/0.#KKR chase coming up shortly.
Scorecard – https://t.co/NbhFO1ozC7 #KKRvLSG #TATAIPL pic.twitter.com/QgoflG8V0o
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून त्यांच्या सलामीवीरांनी शानदार खेळ दाखवला. कर्णधार केएल राहुल आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक यांनी कोलकाताच्या गोलंदाजी फळीचे कंबरडे मोडून काढले. डी कॉकने ७० चेंडू खेळताना २०० च्या स्ट्राईक रेटने नाबाद १४० धावा केल्या. या खेळीसाठी त्याने १० चौकार आणि १० षटकार मारले. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २१० धावांची नाबाद भागीदारीही झाली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकमेवाद्वितीय केएल राहुल, सलग पाचव्या आयपीएल हंगामात ५०० धावा चोपत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
क्लास क्लास क्लास…! क्विंटन डी कॉकचे केकेआरविरुद्ध अवघ्या ५९ चेंडूत शतक
रोहितच्या भन्नाट षटकारानंतर पत्नी रितीकाची खुलली कळी, सारानेही टाळ्या वाजवत केलं कौतुक