RSA vs ZIM Test: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, जिथे तो यजमान संघाविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून म्हणजेच 28 जूनपासून सुरू झाला आहे. (SA vs ZIM 1st Test) ज्यात आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या 19 वर्षीय डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज लुआन-ड्रे प्रिटोरियसने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली खेळी संस्मरणीय बनवत शानदार शतक झळकावले. यात त्याने 61 वर्षांपूर्वीचा एक मोठा रेकाॅर्डही मोडला. (Luan-dre Pretorius debut century)
कसोटी क्रिकेटमध्ये आता दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा रेकाॅर्ड लुआन-ड्रे प्रिटोरियसच्या नावावर नोंदला गेला आहे. त्याने ग्रीम पोलॉकचा रेकाॅर्ड मोडला आहे. पोलॉकने 1964 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 19 वर्षे 317 दिवसांच्या वयात शतकी खेळी केली होती. तर, लुआन-ड्रे प्रिटोरियसबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 19 वर्षे 93 दिवसांच्या वयात ही कामगिरी करून हा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे. लुआन-ड्रे प्रिटोरियसने आपले शतक केवळ 112 चेंडूत पूर्ण केले. दरम्यान त्याने 7 चौकारांसह 2 षटकार मारले. (Youngest Test centurion South Africa)
झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने आपले सुरुवातीचे 4 विकेट्स केवळ 55 धावांवर गमावले होते. यानंतर लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी पदार्पणताच संघाचा डाव सावरत पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली आणि धावसंख्या 150 पर्यंत पोहोचवली. ब्रेव्हिस आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 51 धावा काढून बाद झाला. (Dewald Brevis debut fifty) तर लुआन-ड्रे प्रिटोरियसबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या बॅटमधून 160 चेंडूत 11 चौकारांसह 4 षटकारांच्या मदतीने 160 धावांची खेळी पाहायला मिळाली.