---Advertisement---

दुखापत, खराब फॉर्मवर मात करत ‘या’ 5 भारतीय खेळाडूंचं नशीब चमकलं, संघात केलं दमदार पुनरागमन!

On: गुरूवार, डिसेंबर 25, 2025 3:57 PM
---Advertisement---

भारतीय संघात स्थान मिळवणे सोपे नाही. दरवर्षी अनेक खेळाडू संघात येतात आणि अनेक खेळाडूंना डच्चू दिला जातो. वर्ष 2025 हे अशा खेळाडूंसाठी खूप खास ठरले, ज्यांनी दीर्घ काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केले. या यादीत अशा अनेक दिग्गज खेळाडूंची नावे आहेत, जे संघात परतण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होते.

करुण नायर
2025 हे वर्ष करुण नायर (Karun Nair) कधीही विसरू शकणार नाही. तब्बल 8 वर्षांनंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. जवळपास 2900 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली. मात्र, या दौऱ्यावर नायर आपली खास छाप सोडू शकला नाही.

श्रेयस अय्यर
2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान खराब फॉर्ममुळे श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) संघातून बाहेर करण्यात आले होते. मात्र, श्रेयसने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’ मध्ये शानदार पुनरागमन केले आणि या स्पर्धेत भरपूर धावा केल्या.

ईशान किशन
2023 मध्ये शिस्तीच्या कारणावरून ईशान किशनला (Ishaan kishan) संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर त्याला बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही वगळण्यात आले. मात्र, ईशानने हार न मानता मेहनत घेतली आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’मध्ये सर्वाधिक (517) धावा करून संघात आपले स्थान पुन्हा मिळवले. त्याची आगामी टी-20 विश्वचषक 2026 साठी निवड झाली आहे.

मोहम्मद शमी
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमीने (Mohmmed Shami) जबरदस्त कामगिरी केली होती, पण त्यानंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेला. शमीने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’ च्या अगदी आधी भारतीय वनडे संघात पुनरागमन केले आणि या स्पर्धेत आपली जुनी लय कायम राखत उत्कृष्ट कामगिरी केली.

शुबमन गिल
या यादीतील शेवटचे नाव शुबमन गिलचे (Shubman gill) आहे. गिल बऱ्याच काळापासून भारतीय टी-20 संघापासून दूर होता. मात्र, आशिया चषक 2025 च्या आधी त्याचे टी-20 संघात ‘उपकर्णधार’ म्हणून पुनरागमन झाले. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत सहभाग घेतला. पण, खराब फॉर्ममुळे त्याला टी-20 विश्वचषक 2026 च्या संघातून पुन्हा बाहेर व्हावे लागले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---