आज 24 मार्च रोजी आयपीएल 2025 स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघामध्ये विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना हा दिल्ली कॅपिटल्स संघाने 1 खेळाडू राखून जिंकला. त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले लखनऊ संघाने 209 धावा केल्या आणि दिल्ली समोर जिंकण्यासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीच्या संघाने दोन षटकातच 3 विकेट्स गमावल्या होत्या.
दिल्लीच्या संघासाठी सर्वाधिक धावा आशुतोष शर्मा आणि विप्राज निगम (39) यांनी केल्या. आशुतोष शर्मा इम्पॅक्ट प्लेयरच्या स्वरूपात खेळण्यासाठी आला होता. त्याने संघाला शानदार विजय मिळवून देत 31 चेंडू 66 धावा केल्या त्या दरम्यान त्याने पाच षटकार आणि पाच चौकार झळकावले.
लखनऊ संघासाठी सर्वाधिक धावा निकोलस पुरण याने 30 चेंडूत 75 धावा केल्या यामध्ये त्याने सहा चौकार आणि सात षटकार झळकावले. तसेच लखनऊ साठी मिशेल मार्शने देखील 36 चेंडूत 72 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार तसेच 6 षटकार ठोकले. कर्णधार ऋषभ पंतला आज एकही धावा न करता परत जावे लागले.
दिल्ली संघाबद्दल बोलायचे झाल्यास दिल्लीच्या गोलंदाजांमध्ये मिचेल स्टार्कने प्रभावी गोलंदाजी केली त्याने 42 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 20 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या.
तसेच दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना 30 मार्च रोजी सनरायजर्स हैदराबाद संघाशी होणार आहे.