---Advertisement---

IPL2026: 21 कोटींचा निकोलस पूरन पुन्हा ठरला फ्लॉप; सलग फ्लॉप कामगिरीने संघाच्या डोकेदुखीत वाढ

On: बुधवार, एप्रिल 15, 2026 10:34 PM
---Advertisement---

लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) संघ फलंदाजीसाठी आपल्या परदेशी खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. सध्याच्या टॉप ऑर्डरमध्ये एडेन मार्करम, मिचेल मार्श आणि निकोलस पूरन हे पहिल्या चार क्रमांकांवर खेळताना दिसत आहेत. मात्र, गेल्या हंगामात शानदार खेळ करणाऱ्या निकोलस पूरनने यंदा आपल्या खराब फॉर्ममुळे सर्वांनाच निराश केले आहे, ज्याचा फटका थेट लखनऊच्या कामगिरीला बसताना दिसत आहे.

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यात लखनऊची जबाबदारी पूरनवर होती. मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पूरनने 7 चेंडूंत केवळ 1 धाव काढली आणि जोश हेझलवूडच्या चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. लखनऊने त्याला 21 कोटी रुपयांना रिटेन केले आहे, त्यामुळे त्याच्यावर असलेल्या मोठ्या किमतीचे दडपण स्पष्टपणे जाणवत आहे.

आरसीबी विरुद्धच्या सामन्यात पूरन बाद झाल्यावर संघ दबावाखाली आला होता. अशा वेळी आयुष बदोनी आणि मुकुल चौधरी यांनी छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या खेळी खेळून संघाचा डाव सावरला. आरसीबीच्या गोलंदाजांनी संपूर्ण डावात लखनऊच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची एकही संधी दिली नाही.

आयपीएल 2026 मधील पूरनचा खराब फॉर्म पाहिला तर, या हंगामात पूरनची बॅट पूर्णपणे शांत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 8 चेंडूंत 8 धावा, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 4 चेंडूंत केवळ 1 धाव, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 15 चेंडूंत 13 धावा तसेच गुजरात टायटन्स विरुद्ध 21 चेंडूंत 19 धावा केल्या आहेत. परदेशी खेळाडू आणि विशेषत निकोलस पूरन अपयशी ठरत असूनही, लखनऊ सुपर जायंट्सने भारतीय खेळाडूंच्या बळावर या हंगामात आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---