मार्क वूड याने चार षटकात 15 धावा खर्च करून तब्बल पाच विकेट्स घेतल्या. परिणामी लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल 2023च्या आपल्या पहिल्याच 50 धावांनी विजयी झाला. दिल्ली कॅफिटल्स संघाविरुद्ध लखनऊच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने प्रदर्शन केले, त्यासाठी कर्णधार केएल राहुल याने संघातील सर्वांचे कौतुक देखील केले. चालू आयपीएल हंगामातील हा तिसरा सामना शनिवारी (1 एप्रिल) लखनऊमध्ये पार पडला.
लखनऊने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 193 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांमध्ये 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारू शकला. सामना जिंकल्यानंतर राजस्थानचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) म्हणाला, “खेळपट्टीविषयी आम्हाला जास्तकाही माहीत नव्हते. या खेळपट्टीवर जेवढी धावसंख्या अपेक्षित होते, त्यापेक्षा 25-30 धावा आम्ही जास्त केल्या, असे मला वाटते. काईल मेयर्स (Kyle Meyers) ज्या पद्धतीने खेळला, तसेच इतर फलंदाज फिरकी गोलंदाजीविरुद्ध ज्या पद्धतीने खेळले, त्याच जोरावर या धावसंख्येपर्यंत पोहोचता आले.”
राहुलने पुढे बोलताना संघातील गोलंदाजांचे देखील कौतुक केले. राहुल म्हणाला की, “खेळपट्टीवर दव पडले होते. अशात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुलू होत जाईल, असे मला वाटले होते. पण आमच्या गोलंदाजांच्या अप्रतिम प्रदर्शन केले. आजचा दिवस मार्क वूड (Mark Wood) याचा होता. त्याने अशी गोलंदाजी केली, जे प्रत्येक वेगवान गोलंदाजाचे स्वप्न असते. एकादा खेळाडू एवढच्या चांगल्या फॉर्ममध्ये असतो, तेव्हा संघालाही त्याच्या फॉर्मचा फायदा मिळतो.”
उभय संघांतील या सामन्याच्या एकंदरीत विचार केला तर, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊने प्रथम फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर कायल मेयर्स याने 73 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर 56 धावांची खेळी करू शकला. पण वॉर्नरची एकाकी झूंज संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. वॉर्नरव्यतिरिक्त दिल्लीचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही.
(Lucknow Super Giants captain KL Rahul praised the his players after defeating Delhi Capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्क इधर है! पाच वर्षानंतर आयपीएल खेळायला उतरलेल्या ‘वेगवान’ वूडने मोडला 11 वर्षांपूर्वीचा विक्रम
पहिल्याच सामन्यात दिल्ली ध्वस्त! दणदणीत विजयाने लखनऊ सुपरजायंट्सची सुरुवात, मायर्स-वूड चमकले